आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेताजींवर नाराज झाला हत्ती, जोराने मान हलवली आणि जमिनीवर येऊन पडले विधानसभा उपाध्यक्ष, व्हायरल झाला Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - आसाम विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष बनल्यानंतर कृपानाथ मल्लाह करीमगंज जिल्यात त्यांच्या विधानसभा मतदारसंघात म्हणजे राताबरीमध्ये गेले होते. त्याठिकाणी त्यांच्या समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासाठी खास हत्तीची सवारी आणण्यात आली होती. हत्तीवर बसवून कृपानाथ यांची त्यांच्या मतदारसंघात मिरवणूक काढण्यात येत होती. पण यादरम्यान हत्ती अचानक बिथरला. हत्तीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यात यश आले नाही. हत्तीने जोराने मान हलवली आणि उपाध्यक्ष खाली पडले. सुदैवाने ते जखमी झाले नाहीत. 

 

बातम्या आणखी आहेत...