आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Assam Government Declared Woman Foreigner, Family Said Her Father Was From Bihar

आसाममध्ये बिहारच्या एका महिलेला घोषित केले परदेशी नागरीक, मुलगा म्हणाला- आम्ही बिहारवरून आलोत, तर मग आई परदेशी कसकाय झाली?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनितपूर(आसाम)- येथून एनआरसीशी निगडीत एक चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. आसाममध्ये महिन्याचाय सुरूवातीला ट्रिब्यूनल द्वारे एका 40 वर्षीय महिलेला परदेशी घोषिक करून डिटेंशन सेंटरला पाठवण्यात आले आहे. पण आता महिलेच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, महिलेच्या वडिलांचा जन्म बिहारमध्ये झाला होता आणि ते ब्रिटिशकाळापासून आसाममध्ये राहत आहेत. 


अमिला शाहला 15 जूनला सोनितपूर जिल्ह्यातील ढोलाईबील परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. फॉरनर्स ट्रिब्यूनलने 30 एप्रिलला घोषित केले की, अमिला हे सिद्ध करण्यात अपयशी ठरली की, ती केशब प्रसाद गुप्ताची मुलगी आहे. केशब प्रसादचा जन्म बिहारच्या नालंदामध्ये झाला होता आणि ते 1948 मध्ये आसामच्या प्रतापगड टी ईस्टेटमध्ये आले.


दरम्यान, शाह यांच्या कुटुंबीयाचे नाव नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन(एनआरसी)मध्ये सामिल केले आहे. शाहचा भाऊ रमेश गुप्ता म्हणाले की, '15 जूनला अमिलाला डिटेंशन सेंटर पाठवण्यात आले. आम्ही भारतीय आहोत. आम्ही हिंदी भाषीक आहोत आणि आसाममध्ये राहतोत. आमचे मुळ गाव बिहारमध्ये आहे. आमचे वडील बिहारवरून आसामला आले होते. आम्ही गरीब आणि अशिक्षत असल्यामुळए कागदपत्र ठेवणे कठीण झाले, पण त्याचा अर्थ हे नाही की, आम्ही भारतीय नाहीत. आमचे नाव एनआरसी (NRC) मध्ये आले आहेत.' आता अमिलाचे कुटुंबीय फॉरन ट्रिब्यूनलच्या निर्णयावर गुवाहाटी हायकोर्ट जाण्याच्या तयारीत आहे.

 

अमिला यांचा मुलगा भोला शाह म्हणाला, 'हा एनआरसीचा प्रश्नच नाहीये. एनआरसी अवैध परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यासाठी आहे. आम्ही बिहारचेच रहिवासी आहोत. माझी आई परदेशी कसकाय झाली.' सांगू इच्छितोत की, राष्ट्रीय नागरी नामाकं यादीचा मसुदा 30 जुलै, 2018 ला प्रकाशित करण्यात आला होता, ज्यात 3.29 कोटी लोकांपैकी 2.89 कोटी लोकांचे नाव सामिल करण्यात आले होते. या यादीत 40,70,707 जणांचे नाव नव्हते, तर 37,59,630 जणांचे नाव घेतले नव्हते. तसेच उर्वरित 2,48,077 जणांचे नाव वेगळे ठेवण्यात आले होते.