आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Assam Tripura States Are On Fire, Citizenship Amendment Bill Is Approved, Communication Is Banned In Guwahati

आसाम-त्रिपुरा राज्ये पेटली, इकडे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर, गुवाहाटीत संचारबंदी; आसाम, त्रिपुरात लष्कर, 5 हजार निमलष्करी जवान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हायवेंवर वाहतुकीची कोंडी. ठिकठिकाणी रुळांवरही आंदोलक बसल्याने १४ रेल्वे रद्द किंवा मार्ग बदलले. - Divya Marathi
हायवेंवर वाहतुकीची कोंडी. ठिकठिकाणी रुळांवरही आंदोलक बसल्याने १४ रेल्वे रद्द किंवा मार्ग बदलले.

गुवाहटी : बहुचर्चित नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी संसदेत मंजूर झाले. राज्यसभेत १०५ विरुद्ध १२५ मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी झाल्यानंतर हा कायदा अस्तित्वात येईल. तसेच ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या मुस्लिमेतर लोकांना भारताचे नागरिकत्व मिळेल. दरम्यान, या विधेयकाच्या विरोधात ईशान्य भारतात सलग तिसऱ्या दिवशी निदर्शने सुरू होती. भाजपची सत्ता असलेले आसाम आणि त्रिपुरात तर प्रचंड तणाव आहे. आसाममधील विरोधी निदर्शनांनी उग्र रूप धारण केले असून ३४ वर्षांतील हे सर्वात मोठे आंदोलन ठरले आहे. गुवाहाटीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. केंद्राने निमलष्करी दलाच्या ५० तुकड्या (पाच हजार जवान) विमानाने आसाम व इतर राज्यांत पाठवल्या आहेत. २० कंपन्या काश्मीरमधूनच नेण्यात आल्या. स्थानिक प्रशासनाने लष्कराला मदत मागितली असून त्रिपुरात लष्कर तैनात करण्यात आले आहे. आसाममध्ये लष्कराचे जवान तैनातीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत.

हे जनांदोलनच; ना नेता, ना नेतृत्व... गृहिणीही उत्स्फूर्तपणे आंदोलनात

आसामची राजधानी दिसपूरमध्ये दिवसभर सुरक्षा दलांनी निदर्शकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराची नळकांडी फोडली. कोणत्याही नेतृत्वाविना लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले. सकाळी तर युद्धासारखी स्थिती होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिस, सुरक्षा दलांनी पाण्याचे फवारे, लाठीमार केला. अश्रुधुराची नळकांडीही फोडली. मात्र, जमाव वाढत गेला. २५ लोक जखमी झाले. गुवाहाटी आणि आसामच्या अन्य भागांत रस्त्यांवर जागोजाग जळती टायर्स टाकून निदर्शकांनी वाहतूक अडवली. दिसपूरमध्ये सायंकाळी एका बसला आग लावण्यात आली. दिवसभर बाजारपेठ बंद होती. अनेक जिल्ह्यांत सकाळपासून लोक रस्त्यांवर उतरले असून स्थानिक लोकांनुसार १९८५ च्या आसाम करारापूर्वी सहा वर्षे चाललेल्या आंदोलनासारखेच हे आंदोलन होते.

- त्रिपुरा, आसाममध्ये इंटरनेटवर बंदी
- मुख्यमंत्री सोनाेवाल गुवाहाटी विमानतळावर अडकले
- गुुवाहाटीच्या रस्त्यांवर जाळपोळ, दगडफेक
- राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने १२५, विरोधात १०५ मते; जदयू पाठीशी, शिवसेनेचा सभात्याग
- निदर्शने सुरू असताना तेजपूर दौऱ्याहून आलेले आसामचे सीएम सर्वानंद सोनोवाल गुवाहाटी विमानतळावर अडकले.

इकडे कर्नाटकात मशिदींतून मुस्लिमांना आवाहन...


कागदपत्रे अपडेट ठेवा : देशात एनअारसी लागू करण्याच्या सरकारच्या घोषणेनंतर कर्नाटकात मशिदींतून लाऊडस्पीकरवर मुस्लिमांनी कागदपत्रे अपडेट ठेवावीत, त्रुटी दुरुस्त करा, असे आवाहन केले जात आहे. बंगळुरूत जामिया मशिदीत यासाठी सिटीझन सेंटर उघडण्यात आले आहे.

शिवसेना, बसपाचा सभात्याग, जदयूने मात्र दिली सरकारला साथ


काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नाराजीनंतर या विधेयकाला कडाडून विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या तीन खासदारांनी सभात्याग केला. बसपाच्या दोन खासदारांनी बहिष्कार टाकला. तर पक्षांतर्गत विरोधी सूर असूनही जदयूने या विधेयकाच्या बाजूने मतदान केले.