आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Assam Will Not Run By RSS, Will Run By People Of Assam, Rahul Gandhi Criticized On BJP In CAA Rally

आसामला नागपुरचे चड्डीवाले नाही तर आसामची जनता चालवणार, सीएए विरोध रॅलीत भाजप आणि संघावर बरसले राहुल गांधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंदोलकांवर गोळीबार करण्याची, त्यांचा जीव घेण्याची काय गरज होती? राहुल यांचा सवाल
  • मी सांगितले होते, आसाममध्ये भाजपची सत्ता आली तर हिंसा वाढेल - राहुल गांधी

गुवाहाटी (आसाम) - नागरिकत्व कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून आसामध्ये हिंसक आंदोलने झाली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गुवाहाटी येथे या कायद्याविरोधातील एका रॅलीला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधत म्हणाले की, "आसामसह देशातील युवक या कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांचा जीव घेण्याची काय आवश्यकता होती. हे लोक युवक, माता-भगिनींच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप प्रत्येक ठिकाणी द्वेष पसरवत आहे."राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, "मी निवडणुकीच्या वेळेस सांगितले होते की, आसाममध्ये भाजपचे सरकार आले तर येथील शांती, प्रगती, बांधिलकी संपेल आणि आसाममध्ये पुन्हा हिंसा भडकेल. हे सर्व खरे ठरेल. भाजप जेथे जाते तेथे द्वेष पसरवते. आसामध्ये युवा आंदोलन करत आहेत. अशाचप्रकारे आंदोलनं इतर राज्यात होत आहेत. त्यांच्यावर गोळीबार करण्याची, जीव घेण्याची काय गरज होती? भाजप युवक, माता-भगिनींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आपण भाजप आणि संघाला आसामचा इतिहास, भाषा आणि संस्कृतीवर हल्ला करू देणार नाही. आसामला नागपुरचे लोक तसेच आरएसएसचे चड्डीवाले नाही तर आसामचे लोक चालवतील."

राहुल गांधी म्हटले की, "आसामने मला बंधुता, एकमेकांचा आदर आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याबाबत शिकवले. मी भाषणात तेच बोलतो जे तुम्ही मला शिकवले. आपल्यातील बंधुता, एकता आणि प्रेम हीच आसामची ताकद आहे. भाजपच्या नेत्यांना सांगावे लागेल की, ते तुमची संस्कृती, इतिहासावर हल्ला करू शकत नाहीत. आम्ही सीएए लागू होऊ देणार नाही."