आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भररस्त्यावर अडवली पती-पत्नीची वाट, 2 नराधमांनी पत्नीला फरपटत नेऊन केला बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडोदरा - शहरातील मकरपुरा जीआयडीसीमध्ये सोमवारी रात्री उशिरा एका दांपत्याला भररस्त्यात रोखून 3 जणांनी लुटले. यानंतर त्यातील दोघांनी महिलेचे तोंड दाबून तिच्यावर रेप केला आणि फरार झाले. पोलिसांनी तत्पर कारवाई करत रात्रीच दोघांना अटक केली, एकाचा शोध सुरू आहे. 


6 महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न...
शहरातील मांजलपुर परिसरात किरायाच्या घरात राहणाऱ्या जयश्री राठवा (नाव बदललेले आहे.) यांचे लग्न मांजलपुरातील परेश राठवा (नाव बदललेले आहे.) यांच्याशी सहा महिन्यांपूर्वी झाले होते. दोघेही मकरपुरातील जीआयडीसीमधील ग्लेज कंपनीत मार्केटिंगची ट्रेनिंग घेत आहेत. सोमवारी रात्री उशिरा जयश्री पती परेशसेाबत वडसर ब्रिजजवळ त्यांची वाट पाहत असलेल्या प्रेमिला (नाव बदललेले आहे) या मैत्रिणीला भेटायला निघाले. यादरम्यान प्रेमिलाने जयश्रीला फोनवर सांगितले की, मला एक जण भेटले आहे, तुम्हाला येण्याची आवश्यकता नाही. यामुळे दोघेही परत आपल्या घराकडे जाऊ लागले होते. जेव्हा दोघेही मकरपुरा जीआयडीसी भाजी मार्केटजवळ पोहोचले तेव्हा 3 तरुणांनी त्यांची वाट अडवली.

 

आमचे दारूचे बॉक्स गायब होत आहेत...
दांपत्याची वाट अडवून तिघांनी त्यांना विचारले की, कुठे जात आहात? तेव्हा दोघांनी सांगितले की, आम्ही काम सुटल्यानंतर आता घराकडे जात आहोत. यावर तिघेही म्हणाले की, 3 दिवसांपासून आमचे दारूचे बॉक्स गायब होत आहेत म्हणून आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. तेव्हा दांपत्याने सांगितले की, आम्ही येथे नोकरीसाठी आलो आहोत, आमचे दारूशी काय काम? यानंतर तिघांपैकी एकाने परेशला पकडले. इतर दोघांनी जयश्रीच्या कानातून सोन्याची कर्णफुले काढली आणि मोबाइल हिसकावला. यानंतर परेशच्या खिशातून मोबाइल आणि एक हजार रुपये काढले. यानंतर मोठ्या मुश्किलीने ते त्यांच्या तावडीतून निसटून पुढे निघाले.

 

तिघांनी केला पाठलाग...
हे दांपत्य जात होते तेव्हा तिघांनी त्यांचा पाठलाग केला. वेगाने चालताना परेशचा हात जयश्रीच्या हातातून सुटला. यामुळे तो थोडा पुढे गेला. जयश्री मागे राहिली. तेव्हा दोघांनी जयश्रीला पकडले आणि भाजी मार्केटच्या मोकळ्या मैदानावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर ते फरार झाले. इकडे पत्नीला आपल्या मागे न आलेली पाहून पती परेश पुन्हा त्याच जागेवर पोहोचला. त्याला तेथे पत्नी दिसली नाही. तेव्हा तेथून जात असलेल्या एका वाहनाच्या उजेडात त्याला पत्नी दिसली. दोघेही घरी आले, तेव्हा पत्नीने आपल्यावरील बलात्काराची घटना पतीला सांगितली. यानंतरच पतीने लगेच मांजलपूर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. एक जण फरार झाला आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे जयदीप अजब सिंह पटेल आणि सत्यम अशोकभाई पांडे आहे. तिसरा आरोपी अजय पटेल फरार झाला आहे.

 

पीडितेची हृदयद्रावक आपबीती...
मोकळ्या मैदानात गँगरेप झालेल्या पीडित विवाहितेने सांगितले की, पतीला पळवून लावल्यानंतर तिन्ही नराधमांनी मला म्हटले की, आम्हाला रेप करायचा आहे. यानंतर मला मैदानाजवळच्या झुडपात घेऊन गेले. मी ओरडू लागले परंतु त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. मी ओरडल्याने कुत्रे भुंकू लागले. 


पीडिता म्हणाली की, आमचे पैसे लुटल्यानंतर त्यांनी माझ्या नवऱ्याला पळवून लावले. तेव्हा मला एकटी पाहून त्यांनी म्हटले की, आम्हाला तुझ्यावर रेप करायचा आहे. असे म्हणून ते मला बळजबरी झुडपात घेऊन गेले. तेव्हा मी खूप ओरडले, त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी माझ्या पतीला पळवून लावलेले होते. यामुळे आमचे घरमालक जेव्हा माझा शोध घेत आले तेव्हा ते तिघेही तिथून पळून गेले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना पकडून त्यांची जाहीर धिंड काढली.

 

आईवडिलांना नाही दिली माहिती...
पीडितेवर झालेल्या अत्याचाराची माहिती गावात राहणाऱ्या तिच्या आईवडिलांना दिलेली नाही. फक्त महिलेच्या मोठ्या भावालाच याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पीडितेचे सासू-सासरे तेथे आले. महिलेचे 10वीपर्यंत शिक्षण झालेले आहे. त्यांनी तिन्ही आरोपींची ओळख पटवलेली आहे. पोलिसांसमोर त्यांनी तिघांनाही ओळखले.

 

आरोपींना कोठडी
बलात्काराच्या तिन्ही आरोपींना जयदीप अजबसिंह पटेल, सत्यम अशोक पांडे, तसेच अजय जयंती पटेल यांना बुधवारी कोर्टाने 10 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास अधिकारी एसीपी तेजस पटेल यांनी सांगितले की, दरोड्याचा माल जप्त केल्यानंतर कोठडी मागण्यात आली आहे. या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...