आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिरादित्य यांची तुलना श्रीरामासोबत..नगमा यांच्या स्वागतासाठी भिडले काँग्रेसचे नेते, व्यासपीठावरच झाली बाचाबाची

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवपुरी (मध्यप्रदेश)- काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव आणि अभिनेत्री नगमा यांनी रविवारी शिवपुरीमध्ये प्रचार सभा घेतली. नगमा यांच्या स्वागतासाठी नाव घेण्याच्या आधीच चार-पाच काँग्रेस नेत्यांमध्ये आपसात जुंपली. मंचावरच नेत्यांमध्ये बाचाबाची झाली.

 

ज्योतिरादित्य सिंधिया यांची तुलना श्रीरामासोबत..

नगमा यांनी आपल्या भाषणात खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांची तुलना श्रीरामासोबत केली. त्या म्हणाल्या श्रीमंत असणे वाईट नाही. पण केवळ पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा आपल्या कर्मांनी श्रीमंत बना. राम हे राजा दशरथांचे पुत्र होते, त्यांनी शबरीचे उष्‍ठी बोरे खाऊन गरीबांना आपलेसे केले. त्याप्रमाणेच सिंधियाजी आहेत, जे गोरगरीबांना आणि दलितांना आपल्यासोबत घेऊन चालतात.

 

जेव्हा आमदाराने रोड शो दरम्यान केले होते KISS

- ही घटना मेरठमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या रोड शोमध्ये घडली होती. 

- गर्दीचा फायदा घेत तेथील आमदार गजराज सिंह हे नगमा यांच्या जवळ गेले होते. 

- त्यांनी त्यावेळी नगमा यांच्या गालावर चूंबन घेतले होते.
- त्यानंतर नगमा यांनी त्यांचा हात बाजूला झटकला होता.
- या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
- पण नंतर नगमा यांनी असे काही घडलेच नव्हते असे सांगितले. त्यांनी याला विरोधकांचे कारस्थान असल्याचे सांगितले.

- व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे, गजराज सिंह यांनी नगमाचा चेहरा पकडून आपल्या तोंडाजवळ केला होता.

 

पुढील स्लाइडवर वाचा नगमा यांच्या आयुष्यातील कॉन्ट्रोवर्शिअल किस्से....

बातम्या आणखी आहेत...