आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Know The Power Of One Vote Assembly Elections 2018 Atal Bihari Vajpayee CP Joshi Modi Rahul

एवढी आहे 1 मताची किंमत: सरकार कोसळले, राजाची गादी जाऊन हिटलर आला, फ्रान्समध्ये तर एका मतामुळे राजेशाही संपुष्टात आली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर - इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, जेव्हा फक्त एक मतामुळे सत्तापालट झालेला आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि सीपी जोशी... याचे सर्वात मोठे उदाहरण आहेत. फ्रान्समध्ये तर फक्त एका मताच्या विजयामुळे राजेशाहीच संपुष्टात आली. दुसरीकडे, जर्मनीत एका मताने जिंकूनच हिटलर नाझी दलाचा मुख्य बनला होता... जर तुम्हालाही वाटते की, 'माझ्या एका मताने काय होईल?' तर हे 7 किस्से जरूर वाचाच..


अटल बिहारी वाजपेयी (13 महिन्यांचे सरकार पडले)
1999 : एआयएडीएमकेने पाठिंबा काढल्यानंतर वाजपेयी सरकारला विश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले. विश्वास प्रस्तावाच्या बाजूने 269 आणि विरोधात 270 मते पडली आणि सरकार पडले.

 

सीपी जोशी, काँग्रेस नेते (पराभवाने सीएम बनू शके नाहीत)
2008 : राजस्थान विधानसभा निवडणुकीत सी. पी. जोशींना 62,215 आणि कल्याण सिंहांना 62,216 मते मिळाली. तेव्हा जोशी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते. विशेष बाब अशी की, त्यांच्या मां, पत्नी आणि ड्रायव्हरने तेव्हा मतदान केले नव्हते.


ए. आर. कृष्णमूर्ती, जेडीएस (आमदार बनता-बनता राहिले)
2004 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जेडीएसचे ए. आर. कृष्णमूर्तींना 40,751 मते मिळाली आणि काँग्रेसच्या के. आर. ध्रुवनारायण यांना 40,752 मते मिळाली. फक्त सुटी न मिळाल्याने त्यांच्या स्वत:च्या ड्रायव्हरला मतदान करता आले नव्हते.


फ्रान्समध्ये राजेशाही संपली (...अन् लोकशाहीने घेतला श्वास)
1875 : फ्रान्समध्ये तर सत्तेचे पूर्ण रूपच बदलून गेले होते. एका मताच्या विजयामुळेच फ्रान्समध्ये राजेशाही संपुष्टात आली आणि लोकशाहीची सुरुवात झाली. अन्यथा तेथील माणसे आतापर्यंत राजेशाहीतच राहिली असती.


अमेरिकेची भाषा बदलली (अन्यथा मातृभाषा जर्मन झाली असती)
1776 : अमेरिकेला एक मतामुळेच जर्मनीच्या जागी इंग्रजीच्या रूपात त्यांची मातृभाषा मिळाली होती. तेथे 1910 मध्ये रिपब्लिक उमेदवार एका मताने पराभूत झाले होते आणि पक्ष जणू शोकसागरातच बुडाला होता.

 

अॅडॉल्फ हिटलर, जर्मनी (नाझी दलाचा प्रमुख बनला)
1923 : जर्मन लोकांना विचारा एका मताची ताकद काय असते ते? कारण सन 1923 मध्ये अॅडॉल्फ हिटलर एका मताच्या फरकाने जिंकूनच नाझीचा दलाचा प्रमुख बनला होता.

 

रुदरफोर्ड बी. हायेस (अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बनले)
1876 : 19व्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत रुदरफोर्ड बी. हायेस यांनी 185 मते मिळवली होती आणि सॅमुअल टिलडेन यांना 184 मते मिळाली. खरे तर प्राथमिक फेऱ्यांमध्ये टिलडेन 2.5 लाख मतांनी जिंकले होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...