विधानसभा 2019 / युतीची यादी, निवडणूक जाहीर न झाल्याने काँग्रेसचेही वेट अँड वाॅच

congress assembly election candidate list

दिव्य मराठी

Sep 21,2019 08:14:00 AM IST

विनोद यादव | मुंबई
महाराष्ट्रातील ५० उमेदवारांची यादी काँग्रेस शुक्रवारी जाहीर करणार हाेती, मात्र हा मुहूर्त टळला. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने ६१ उमेदवार सहमतीने निश्चित केले आहेत. मात्र शुक्रवारीही निवडणूक आयाेगाने कार्यक्रमाची घाेषणा न केल्याने, तसेच भाजप- शिवसेनेच्या युतीच्या जागावाटपाचा निर्णयही गुलदस्त्यात राहिल्याने काँग्रेसने पहिली यादी प्रकाशनाचा मुहूर्त दाेन दिवस पुढे ढकलल्याची
माहिती आहे.


केंद्रीय समितीतील एका ज्येष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’ला सांगितले, ‘छाननी समितीने पाठवलेल्या नावांपैकी सुमारे ६१ नावांवर केंद्रीय समितीने शिक्कामाेर्तब केले आहे. त्याआधारेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांनी दाेन दिवसांत यादी जाहीर करण्याची घाेषणा केली हाेती.’ दुसरीकडे, पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगाेपाल, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले, केंद्रीय समितीने ज्या ६१ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत तीच अंतिम आहेत. त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसल्याने ही यादी जाहीर करण्यात आलेली नाही.’


काही उमेदवारांकडे पैशाची चणचण
लाेकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष साेडला. काही नेते उंबरठ्यावर आहेत. त्यातच भाजप-शिवसेनेच्या यादीपूर्वी काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाल्यास जातीय व विभाग स्तरावरील समीकरणांचा मेळ घालण्यात अडचणी येऊ शकतात. विद्यमान आमदार व गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांना काँग्रेस तिकीट देणार आहे. मात्र यापैकी अनेक जण सध्या निवडणुकीचा खर्च करण्यास सक्षम नाहीत. यात युवक उमेदवारांचा जास्त समावेश आहे. या नावांना स्थानिक पातळीवर विराेध हाेण्याची शक्यताही पक्षाला वाटते.


संभाव्य 30 उमेदवारांची यादी, अजूनही पक्षांतराची भीती

नाव मतदारसंघ
बाळासाहेब थोरात संगमनेर
केसी. पडवी अक्कलकुवा
पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण
विश्वजित कदम पलूस-कडेगाव
ऋतुराज पाटील द. कोल्हापूर
रमेश बागवे पुणे कँटोनमेंट
विजय वडेड्डीवार ब्रह्मपुरी
यशोमती ठाकूर तिवसा
वसंत पुरके राळेगाव
हर्षवर्धन सपकाळ बुलडाणा
रणजित कांबळे वर्धा
अमर काळे आर्वी
सुनील केदार सावनेर
माणिक जगताप महाड
वर्षा गायकवाड धारावी
नसीम खान चांदिवली
अमीन पटेल मुंबादेवी
भाई जगताप कुलाबा

X
COMMENT