आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Assembly Election Results 2019: Odisha, Andhra Pradesh, Arunachal Pradesh, Sikkim Vidhan Sabha Chunav Results 2019 LIVE

विधानसभाLIVE/ आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी, ओडिशात पाचव्यांदा पटनायक यांची सत्ता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क- आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्राथमिक निकालात वायएसआर काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. जगनमोहन रेड्डींचा पक्ष वायएसआर काँग्रेस 147 जागेंनी आघाडीवर आहे. 2014 मध्ये चंद्रबाबू नायडूंची तेलुगू देसम पार्टीला बहुमत मिळाले होते. राज्यात बहुमतासाठी 175 पैकी 88 जागेंची गरज आहे. तर दुसरीकडे, अरुणाचल प्रदेशात भाजपा, सिक्किममध्ये एसडीएफ आघाडीवर आहे.


ओडिशामध्ये नवीन पटनायक सलग पाचव्यांदा सरकार बनवण्याच्या दिशेने आहे. त्यांचा पक्ष बीजद 100 सीट्सनी आघाडीवर आहे. राज्यात एकून 147 सीट आहेत, सरकार बनवण्यासाठी 74 जागेंची गरज आहे. यापूर्वी पटनायक यांनी 2000, 2004, 2009 आणि 2014 मध्ये सरकार स्थापन केली होते.


आंध्र प्रदेश-  एकून जागा- 175, बहुमत- 88

 

 

पक्ष

2019 (आघाडी) (175/175 सीट)    

2014 मध्ये जागा        

2014 मध्ये व्होट शेअर

तेदेपा

27

102

44.9 %

वायएसआर काँग्रेस       

148

67

44.6%

भाजपा

00 

04

2.2%

इतर

00

02

2%

 

 

तेदेपा आणि वायएसआरएस काँग्रेसमध्ये सामना
आंध्रप्रदेश विधानसभेच्या 175 जागेंसाठी 11 एप्रिलला 79.88% मतदान झाले होते. हे 2014 पेक्षा 1% ज्यास्त आहे. राज्यात अंदाजे 3.13 कोटी मतदारांनी 2118 उमेदवारांना मतदान केले होते. जगनमोहन यांनी 3000 किलोमीटर पायी यात्रा करून राज्यात नायडू सरकारच्या भ्रष्टाचारविरूद्ध मोठी मोहिम छेडली होती. विशेषज्ञानुसार, 2014 च्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमध्ये तेदेपा सरकार येण्याचे मोठे कारण काँग्रेसविरूद्ध अँटी इनकम्बेंसी आणि पक्षाचे राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन होते. पण, 2018 मध्ये तेदेपाने विशेष राज्याच्या मुद्द्यावर एनडीएसोबतची युती तोडली. जगन यांनी या मुद्द्यालाही आपल्या भाषणात समोर घेतले.

 

ओडिशा : कुल सीटें : 147, बहुमत : 74

 


 

पक्ष                

   2019 (आघाडी) (144/146* जागा )        

  2014 मध्ये जागा       

2014 मध्ये व्होट शेअर

बीजद

107

117

43.9 %

काँग्रेस

11

16

26%

भाजपा

26

10

18.2%

इतर

02

4

11.9%

 

 

एका जागेवर निवडणूक झालीच नाही- पतकुड़ा विधानसभेच्या जागेवर बीजदचे उमेदवार बेद प्रकाश अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर तेथील निवडणूक रद्द करण्यात आली. ओडिशा विधानसभेच्या 146 जागेंसाठी चार टप्प्यात 73.83% मतदान झाले होते. हे मागील मतदनापेक्षा अर्धा टक्का जास्त आहे. 2014 मध्ये 73.9% मतदान झाले होते.  

 

पक्ष             

 2019 आघाडी (11/32 जागा)       

 2014 मध्ये जागा        

 2014 मध्ये व्होट शेअर

एसडीएफ  

08 

22

55.8%

एसकेएम

00

10

41.4%

नोटा

00

4460 वोट

1.4%

 

 

सिक्किम विधानसभेच्या 32 जागेंसाठी 18 एप्रिलला 78.72% मतदान झाले. हे मागील निवडणुकीपेक्षा 4.78% कमी आहे. 2014 मध्ये 83.5% मतदान झाले होते.

 

पक्ष              

2019 आघाडी (15/57* जागा )           

2014 मध्ये जागा          

2014 मध्ये व्होट शेअर

काँग्रेस     

00

42

50%

भाजपा

12

11

31.1%

पीपीए

00

5

9.1%

इतर

03

2

5%

 

 


तीन जागेंवर भाजपचा बिनविरोध विजय- अरुणाचल प्रदेशच्या 60 पैकी 57 जागेंवर निवडणुका झाल्या. 11 एप्रिलला 74.03% मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत  7% मतदान जास्त झाले. तीन जागेंवर भाजपने बिनविरोध विजय मिळवला.

बातम्या आणखी आहेत...