आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळग्रस्तांना मदत, आकस्मिकता निधीमध्ये दोन हजार कोटींची वाढ 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात २०१८ च्या खरीप हंगामातील नैसर्गिक परिस्थितीमुळे १५१ तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकाच्या नुकसानीपोटी तातडीने मदत वाटप करण्यासाठी २ हजार कोटींचा आकस्मिकता निधी अग्रिमद्वारे उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाकडून मंगळवारी मान्यता देण्यात आली. यासाठी राज्याच्या आकस्मिक निधीच्या १५० कोटी इतक्या कायमच्या मर्यादेत २ हजार कोटींनी तात्पुरती वाढ करून ती २ हजार १५० कोटी इतकी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

 

राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीबद्दल तातडीने मदत वाटप करण्यासाठी २ हजार कोटी इतका अतिरिक्त निधी आकस्मिक निधी अग्रिमाद्वारे उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. 

 

अटल महापणन विकास यशोगाथा या पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. या वेळी मंत्री चंद्रकांत पाटील, महादेव जानकर, एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 
 

बातम्या आणखी आहेत...