जालन्यात सहायक पोलिस / जालन्यात सहायक पोलिस निरीक्षकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या, पोलिस प्रशासनात मोठी खळबळ

दिव्य मराठी वेब टीम

Feb 15,2019 03:22:00 PM IST

जालना- अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षकाने सहायक रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्‍महत्‍या केल्‍याची धक्कादायक घटना घडली आहे. गोंदी येथील पोलिस वसाहतीत शुक्रवारी (ता.15) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अनिल परजणे असे या आत्‍महत्‍या केलेल्‍या सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

कॅनलमध्ये पडलेले वाहन काढण्यासाठी पहाटे 4 वाजेपर्यत केली मदत..
अनिल परजणे यांनी शुक्रवारी पहाटे 4 वाजेर्यंत कॅनलमध्ये पडलेले वाहन काढण्यासाठी मदत केली. अचानक झालेल्या या घटनेमूळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस उपनिरीक्षक सी. डी. सेवगन तसेच उप निरिक्षक हनुमंत वारे यांनी गोंदी येथे भेट दिली. परजणे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे, हे अद्याप समजू शकले नाही.

अनिल परजणे हे मागील दोन वर्षांपासून गोंदी येथील पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. अवैध वाळू वाहतुकीच्या मुद्द्यावरून वाळू माफीया आणि पोलिस दलातील वरिष्ठांसोबत त्यांचे किरकोळ वाद झाले होते.

अनिल परजणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

X
COMMENT