आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Assistant Police Inspector Sachin Shinde Death In A Car Accident Near Satara

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस निरीक्षकाचा अपघाती मृत्यू, सातारा जिल्ह्यातील उडतरे फाट्याजवळ झाला कारला अपघात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन प्रताप शिंदे (34, रा.पाटखळ,ता.सातारा) यांचे अपघाती निधन झाले. पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आणेवाडी (ता.वाई) जवळ शिंदे यांच्या कारला रविवारी रात्री भीषण अपघात झाला होता. कारचा टायर अचानक फटला होता. या अपघात इतर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

 

सचिन शिंदे हे बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेडा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. वडिलांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ते मागील काही दिवसांपासून सुटी घेऊन गावी लाले होते. शिंदे आपल्या चुलत भावांसोबत मुंबईहुन सातार्‍याकडे परत येत होते. आणेवाडीजवळ त्यांच्या कारचा टायर अचानक फुटला. कार दोनदा पलटी झाली. शिंदे यांच्यासह त्यांचे चुलत भाऊ या अपघातात गंभीर जखमी झाले. तिघांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले. परंतु शिंदे यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. सचिन शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे.