आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Asteroid Of Twice Height Than The Eiffel Tower Will Pass Near By Earth At A Speed Of 44 Thousand Kilo Meters

आयफिल टॉवरपेक्षा दुप्पट उंचीचे अॅस्टेरॉईड 44 हजार किलोमीटरच्या वेगाने पृथ्वीजवळून जाणार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

न्यूयाॅर्क : जेव्हा जगातील अनेक देश ख्रिसमस साजरा करत असतील तेव्हा पॅरिसच्या आयएफिल टॉवरपेक्षा दुप्पट मोठे अॅस्टेराॅइड (क्षुद्रग्रह) पृथ्वीच्या जवळून 44,172 किमी प्रति तासाच्या वेगाने जाणार आहे. हे अॅस्टेराॅइड याच आठवड्यात 26 डिसेंबर म्हणजेच बाॅक्सिंग-डे च्या दिवशी सकाळी 7.52 वाजता जाईल. 


नासानुसार, अंतराळातील लघुग्रहाचा व्यास सुमारे 2,034 फूट (620 मीटर) आहे. असे अॅस्टेराॅइड पृथ्वीच्या जवळून अनेकदा जात असतात. वेळोवेळी नासा याबद्दल अलर्ट जारी करत असते. अनेकदा एकाच दिवशी खूप सारे अॅस्टेराॅइड पृथ्वीच्या जवळून जातात आणि जमिनीवर लोकांना याचा आभासदेखील नाही. आताचे हे अॅस्टेराॅइड 2000 मध्ये शोधले गेले होते. यामुळे याला 2000 सीएच-59 नाव दिले गेले आहे. 

44172 किमी पार्टी तासाच्या वेगाने पुढे येत आहे... 


नासाचा अंदाज आहे की, याचा आकार 919 फूट आणि 2,034 फूट यांच्यामध्ये असू शकतो. अशात हे आयफिल टाॅवर (1,063 फूट) आणि अॅपायर अॅस्टेट बिल्डिंग (1,453 फूट) पेक्षा जास्त मोठा असल्याचे सांगितले जाते. नासाच्या गणनेनुसार, हे 44,172 किमी प्रति तासाच्या वेगाने पुढे येत आहे आणि हे पृथ्वीपासून 7,291,400 किमीच्या अंतरावरून जाणार आहे. म्हणजे हे पृथ्वीच्या चंद्रापासूऊंच्या अंतरापेक्षा 19 टक्के दुरून जाणार आहे. मात्र खगाेलीय भाषेमध्ये हे पृथ्वीच्या खूप जवळून जात आहे. हे अंतर पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या 12 व्या भागाच्या बरोबरीचे आहे. 

बातम्या आणखी आहेत...