आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकर्षण वाढवण्यासाठी पाकिटात किंवा खिशात आणि घराची बरकत वाढवण्यासाठी या खास ठिकाणी ठेवा मोरपंख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाच्या सर्वात प्रिय गोष्टींमधील एक गोष्ट मोरपंख आहे. श्रीकृष्ण आपल्या मस्तकावर मोरपंख धारण केलेले असतात. यामुळे मोरपंख अत्यंत पवित्र आणि चमत्कारी मानला जातो. याच्या शुभ प्रभावाने घर-कुटुंबातील सर्व अडचणी नष्ट होतात. कुंडलीतील दोष असल्यास तेही दूर होतात. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, मोरपंखाचे काही खास उपाय...


पहिला उपाय
घरामध्ये मोरपंख ठेवल्याने वास्तू आणि ज्योतिषचे विविध दोष दूर होऊ शकतात. मोरपंख घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तच्या दृष्टीस पडेल अशाठिकाणी ठेवावा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि सकारात्मक शक्ती वाढते.


दुसरा उपाय 
घर किंवा बेडरूमच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला मोरपंख लावावा. काही दिवसानंतर याचे सकारात्मक फळ दिसून येईल. या दिशेला मोरपंख लावल्याने घराची बरकत वाढते.


तिसरा उपाय 
जो व्यक्ती नेहमी आपल्या जवळपास मोरपंख ठेवतो, त्याचे राहू दोष कमी होतात.


चौथा उपाय 
आकर्षण वाढवण्यासाठी मोरपंख पाकिटात किंवा खिशामध्ये ठेवावा.


पाचवा उपाय 
सरस्वती देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःजवळ मोरपंख ठेवावा. याच्या शुभ प्रभावाने ज्ञान वाढते आणि परीक्षेत यश प्राप्त होते.


सहावा उपाय 
घरच्या मुख्य दरवाजाशी संबंधित काही दोष असल्यास दारावर तीन मोरपंख लावावेत. मोरपंखाखाली श्रीगणेशाचा फोटो लावल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात.


सातवा उपाय 
मोराचा प्रिय आहार साप आहे, यामुळे साप मोराला घाबरतात. मोरपंख असलेल्या ठिकाणी साप जात नाहीत. यामुळे घरात मोरपंख ठेवल्यास सापाची भीती राहत नाही.

बातम्या आणखी आहेत...