आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशिबाला दोष देत बसू नका, या 7 कामांमुळे बदलू शकते तुमचे भाग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीच्या आयुषयात अडचणी येत-जात राहतात. परंतु काही लोकांना आयुषयात नेहमीच अडचणींना सामोरे जावे लागते. तुमच्या आयुष्यातही वारंवार अडचणी निर्माण होत असतील तर सकाळी-सकाळी काही सोपे उपाय करून तुम्ही या अडचणीतून मुक्त होऊ शकता. हे काम खूप सोपे असून कोणताही व्यक्ती सहजपणे करू शकतो.


देवाची पूजा करावी
सकाळी स्नान केल्यानंतर अक्षता, कुंकू, फुल, फळ अर्पण करून देवाची पूजा करावी. दिवा लावावा. यामुळे सर्व देवता प्रसन्न होतात. फुलं ताजीच असावीत, भगवान श्रीकृष्णाला तुळस अवश्य अर्पण करावी.


सूर्याला अर्घ्य द्यावे
शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, जे लोक नियमितपणे सूर्याला जल अर्पण करतात त्यांना घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान प्राप्त होतो. उत्तम आरोग्यासोबतच दीर्घायुष्य प्राप्त होते. या उपायाने त्वचेही चमक वाढते तेसेच आरोग्याशी संबंधित विविध लाभ प्राप्त होतात.


गायत्री मंत्राचा जप
रोज सकाळी स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा. यामुळे तुमच्यामध्ये काम करण्याच्या क्षमतेचा विकास होईल.


तुळशीजवळ दिवा लावावा
सकाळी पूजा केल्यानंतनार तुळशीजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा अवश्य लावावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.


मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा
रोज सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी कुटुंबातील मोठ्या व्यक्तींच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होण्यास मदत मिळेल आणि कामातील अडथळे दूर होतील.


या उपायांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...