Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | astrological measure for goddess lakshmi blessing

महालक्ष्मी कृपेसाठी घरातील महिलेने सकाळी अवश्य करावे हे एक काम 

रिलिजन डेस्क | Update - Feb 10, 2019, 12:04 AM IST

हा एक उपाय तुम्हाला करू शकतो धनवान, प्राप्त होईल महालक्ष्मीची कृपा

  • astrological measure for goddess lakshmi blessing


    एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदोष असल्यास त्याला भाग्याची साथ मिळत नाही. कोणत्याही कामामध्ये खूप कष्ट करूनही योग्य धनलाभ होत नाही. धनलाभासाठी देवी लक्ष्मीची पूजा करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. या उपायाने कुंडलीतील दोषही दूर होऊ शकतात. महालक्ष्मीच्या कृपेने कुटुंबात सुख-समृद्धी राहते. येथे जाणून घ्या, असाच एक उपाय.


    - घरातील जी महिला सकाळी लवकर उठते, तिने हा उपाय करावा. घराच्या आत आणि बाहेर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.


    - महिलेने स्नान करून तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यामध्ये तुळशीची पाने टाकून दारासमोर हे पाणी शिंपडावे.


    - दारावर पाणी शिंपडताना महालक्ष्मी मंत्राचा जप करावा. लक्ष्मी मंत्र- ऊँ महालक्ष्मयै नम:

Trending