आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरणशक्ती कमजोर होत असल्यास रोज करावेत हे 6 काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोक सांगितलेल्या गोष्टी काही काळाने विसरून जातात, यामागचे कारण म्हणजे त्यांची स्मरशक्ती कमजोर असू शकते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्राचीन काळापासून काही प्रथा प्रचलित आहेत. या प्रथांचे पालन केल्यास बुद्धीशी संबंधित लाभ प्राप्त होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ज्योतिषमध्ये बुद्धी कारक ग्रह बुध मानण्यात आला आहे. कुंडलीमध्ये बुध ग्रहाची स्थिती शुभ असल्यास व्यक्तीला बुद्धीशी संबंधित कामामध्ये लाभ होतो परंतु बुध अशुभ स्थितीमध्ये असल्यास व्यक्तीची बुद्धी कमजोर राहते. येथे जाणून घ्या, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कोणकोणते काम केले जाऊ शकतात...


1. स्मरणशक्ती वाढवण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे ध्यान करणे. रोज सकाळी थोडावेळ मेडिटेशन केल्याने मनाला शांती मिळते आणि बुद्धी फास्ट काम करू लागते.


2. श्रीगणेशाला सुख-समृद्धी आणि बुद्धीचे दाता मानले जाते. रोज सकाळी स्नान केल्यानंतर श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करून गणपती अथर्वशीर्षचा पाठ करावा.


3. रोज सकाळी दोन्ही हातांचे दर्शन घ्यावे. यामुळे महालक्ष्मी, भगवान विष्णू आणि देव सरवस्तीची कृपा प्राप्त होते. बुद्धी तल्लख होते.


4. देवी सरस्वतीला केशरी भाताचा नैवेद्य दाखवावा. यामुळे देवी प्रसन्न होते आणि बुद्धीशी संबंधित कामामध्ये लाभ प्राप्त होतो.


5. बुध ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी एखाद्या किन्नराला हिरव्या बांगड्या दान कराव्यात.


6. हनुमान चालिसाचा खाली सांगण्यात आलेला दोहा 108 वेळेस रोज म्हणावा.

दोहा- 
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। 
बल बुद्धि विद्या देहु मोही, हरहू कलेश विकार।।

बातम्या आणखी आहेत...