Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Astrological Tips For Guruwar And Ekadashi Yog

दुर्भाग्य दूर करण्यासाठी आजचा दिवस शुभ, योग्य उपाय केल्यास सर्व अडचणी होतील नष्ट

रिलिजन डेस्क | Update - Sep 06, 2018, 11:21 AM IST

आज (गुरुवार, 6 सप्टेंबर) श्रावण मासातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. ही तिथी भगवान विष्णूंच्या पूजेसाठी सर्वात श्रेष्ठ मान

 • Astrological Tips For Guruwar And Ekadashi Yog

  आज (गुरुवार, 6 सप्टेंबर) श्रावण मासातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. ही तिथी भगवान विष्णूंच्या पूजेसाठी सर्वात श्रेष्ठ मानण्यात आली आहे. या दिवशी करण्यात आलेले उपाय लवकर शुभफळ प्राप्त करतात. ज्योतिषमध्ये देवगुरु बृहस्पती यांना गुरुवारचा कारक ग्रह मानण्यात आले आहे. या दिवशी गुरु ग्रहाचे उपाय केल्यास कुंडलीतील विविध दोष दूर होऊ शकतात. गुरु भाग्य आणि धर्म कारक ग्रह आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, एकादशी आणि गुरुवारच्या योगामध्ये राशीनुसार कोणते उपाय केल्यास व्यक्तीचा भाग्योदय होऊ शकतो....


  मेष राशि- चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ
  या राशीच्या लोकांनी गुरुवार आणि एकादशी योगामध्ये लाल फळांचे दान केल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात.


  वृष- ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
  या राशीच्या लोकांनी गुरुवारी पांढरे वस्त्र दान एखाद्या गरिबाला दान केल्यास श्रेष्ठ फळ प्राप्त होऊ शकतात.


  मिथुन- का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
  या राशीच्या लोकांनी एखाद्या गरीब व्यक्तीला हिरव्या पालेभाज्या दान कराव्यात.


  कर्क- ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
  कर्क राशीच्या लोकांनी एकादशीला एखाद्या गरीब मुलाला दूध दान करावे.


  सिंह- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
  या राशीच्या लोकांनी गुरुवारी लाल वस्त्र आणि गुळाचे दान करावे.


  कन्या- ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
  कन्या राशीच्या लोकांनी फळांचे दान करणे शुभ राहते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींचे उपाय...

 • Astrological Tips For Guruwar And Ekadashi Yog

  तूळ - रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
  या लोकांनी गुरुवारी केळीचे दान केल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात.


  वृश्चिक- तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
  या राशीच्या लोकांनी गहू आणि गूळ दान करणे शुभ राहील.

 • Astrological Tips For Guruwar And Ekadashi Yog

  धनु- ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
  धनु राशीच्या लोकांनी गुरुवार आणि एकादशी योगात पिवळे वस्त्र धारण करून केळीच्या झाडाची पूजा करावी.


  मकर- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
  या राशीच्या लोकांनी एखाद्या गरजू व्यक्तीला चप्पल-बूट दान करावेत.

 • Astrological Tips For Guruwar And Ekadashi Yog

  कुंभ- गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
  कुंभ राशीच्या लोकांनी एखाद्या गरिबाला काळे वस्त्र दान करावेत.


  मीन- दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची
  मीन राशीच्या लोकांनी गुरुवारी हरभरा डाळ दान करावी.

Trending