आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या वर्षी शनी बदलणार नाही राशी परंतु धनूमध्ये वक्री होणार, 2019 शी संबंधित ज्योतिषच्या खास गोष्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष 2019 ची सुरुवात मंगळवारपासून होत आहे आणि हे वर्ष मंगळवारीच समाप्त होत आहे. या वर्षी 7 मारचोपासून राही-केतू राशी परिवर्तन करून पुन्हा मिथुन आणि धनु राशीमध्ये प्रवेश करतील. या दिवशी गुरु ग्रहसुद्धा धनु राशीमध्ये प्रवेश करेल. गुरु 2 मेपासून पुन्हा वक्री होऊन वृश्चिकमध्ये येईल. पंचांग भेदमदामुळे या तारखा बदलू शकतात. शनी संपूर्ण वर्ष धनु राशीमध्ये राहील. याच राशीमध्ये शनी 5 मे पासून 11 सप्टेंबरपर्यंत वक्री राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, 2019 वर्षाशी संबंधित काही खास गोष्टी...


> पं. शर्मा यांच्यानुसार देशाच्या स्वातंत्र्याच्यावेळी जी राशी होती, त्यानुसार या वर्षी 7 मार्चनंतर देशाची राशी कर्कमध्ये राहूचे गोचर समाप्त होईल. देशातील व्यापारात वृद्धी होईल. विविध वाद नष्ट होतील. सत्ता पक्षाला लाभ होईल. येणाऱ्या सामान्य निवडणुकीत सत्ता पक्षाला पुन्हा यश प्राप्त होऊ शकते.


> मकरसंक्रांतीला व्याघ्र वाहन आणि दिवाळी वराह वाहनावर येईल. दिवाळी 27 ऑक्टोबर 2019, रविवारीपासून साजरी केली जाईल. या वर्षी देशात चांगला पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाचा काळ राहील. दिवाळीतही व्यापारात तेजी राहील.


> विदेशातूनही भारताला लाभ होईल. रुपयाच्या भावामध्ये वर्षी होईल. केंद्रामध्ये मजबूत सरकार बनेल. वर्तमान पंतप्रधानांचा कार्यकाळ वाढेल.


> नवीन हिंदू वर्षाचे नाव परिधावी असेल. या वर्षाचे स्वामी शनिदेव आणि मंत्री सूर्य राहतील. हे वर्ष देशासाठी चांगल्या वर्षांमध्ये गणले जाईल.