आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वृक्ष : यांची निगा राखल्याने, पाणी घातल्याने आणि पूजा केल्याने होऊ शकतो भाग्योदय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये झाडाला देवता स्वरूप मानण्यात आले आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार काही झाडे असेही आहेत, ज्यांची निगा राखल्याने, पाणी दिल्याने आणि पूजा केल्याने सर्व समस्या दूर होऊ शकतात. हे वृक्ष तुमचा भाग्योदय करू शकतात. आज आम्ही तुम्हाला या झाडांविषयी खास माहिती सांगत आहोत.


1. तुळस
ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी अशा घराला सोडून कधीही जात नाही. अशा घरामध्ये नेहमी सुख-समृद्धी राहते.


2. पिंपळ
हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला पूजनीय मानण्यात आले आहे. या झाडाची पूजा केल्याने शनी दोषातून मुक्ती मिळते भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते.


3. वड
याला वड किंवा वटवृक्ष असेही म्हणतात. या झाडाची पूजा केल्याने महिलांचे सौभाग्य अखंड राहते आणि अपत्याशी संबंधित सर्व दोष दूर होतात.


4. आवळा
या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पूजा करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत नाही.


5. बिल्व 
या झाडाची पाने आणि फळ महादेवाला अर्पण करावेत. या झाडाची पूजा केल्याने नोकरीत प्रमोशनचे योग जुळून येऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन झाडांविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...