आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लडाखमध्ये ज्योतिष ग्राम साकारले; महिलांकडे व्यवस्थापन, दररोज १० पर्यटकांची भेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेह  - लडाखमध्ये जगातील पहिले अॅस्ट्रो व्हिलेज वसवण्यात आले आहे. तेथे निवासाचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचे व्यवस्थापन ३० महिलांकडे आहे. लडाख शिखरावर वसलेले आहे. येथील हवा-पाणी शुष्क आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा भाग एकदम योग्य आहे. 

या भागात आकाशात तारे व ग्रहांचे नीटपणे निरीक्षण करता येऊ शकते. पूर्वीपासूनच लडाख हिमशिखरांमुळे पर्यटकांचे पसंतीचे ठिकाणी आहे. आता अॅस्ट्रो व्हिलेजमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. स्थानिक लोकांनी लडाखची रात्र संसाधनाच्या रूपात पाहिली. त्याला रोजगाराचे साधन बनवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. म्हणूनच येथे ज्योतिष अभ्यासक, जिज्ञासूंसाठी मुक्काम करण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.  सामाजिक संस्था ग्लोबल हिमालयन एक्सपेडिशनने २०१३ मध्ये स्थानिक लोकांना अॅस्ट्रो होम स्टे तयार करण्यासाठी प्रेरणा दिली आहे. संस्थेने इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल संघटनेसह हा प्रकल्प सुरू केला. प्रकल्पाचे नाव अॅस्ट्रॉनॉमी फॉर हिमालयन लाइव्हलीहूड (एएचएलसी) असे आहे. संस्थेने पहिल्यांदा अॅस्ट्रो व्हिलेजमध्ये मुक्कामाची व्यवस्था केली. महिलांना ते चालवण्याचे प्रशिक्षण दिले. या महिला टेलिस्कोप ऑपरेट करू शकतात.. त्यांची आकाशातील घडमोडींबद्दलची समजही वाढली .
 

दररोज १० पर्यटकांची भेट 
लडाखचे पहिले अॅस्ट्रो होम स्टे पँगाेंग टिसोजवळ मान गावात वसवण्यात आले आहे. गावातील ४ महिलांना नाइट स्काय वॉचिंगचे प्रशिक्षण दिलेआहे. येथे १० इंची ट्रॅकिंग टेलिस्कोप आहे. गेल्या दोन महिन्यांत २०० हून अधिक पर्यटकांनी या भागाला भेट दिली. त्यातून ५० हजारांवर उत्पन्न झाले. लडाखमध्ये पाच अॅस्ट्रो होम स्टे आहेत. येथे दररोज ८-१० पर्यटक  येतात.