आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसुसने लॉन्स केला नवीन तंत्रज्ञान असलेला लॅपटॉप, कीबोर्डच्या जागी असेल स्क्रीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- तायवानमध्ये सुरू असलेल्या कम्प्यूटॅक्स 2019 इव्हेंटमध्ये आसूसने जगातील पहिला दोन स्क्रिन असणारा लॅपटॉप लॉन्च केला आहे. या लॅपटॉपची दुसरी स्क्रिन कि-बोर्डच्या बाजूने असून ही स्क्रीन 4K रेझोल्यूशनला सपोर्ट करते. या लॅपटॉपचे नाव झेनबुक प्रो-डुओ असे आहे. लॅपटॉपमध्ये देण्यात आलेली दुसरी स्क्रिन एका एजपासून दुसऱ्या एजपर्यंत आहे. तसेच, या इव्हेटमध्ये कंपनीद्वारे झेनबुक 30 अॅडिशन, झेनबुक 13, झेनबुक 14 आणि झेनबुक 15 लॅपटॉपही लॉन्च करण्यात आले. 


अॅसूस झेनबुक प्रो-डुओचे वैशिष्टय
या लॅपटॉपमध्ये देण्यात आलेली साइज 15.6-इंच आहे, जी 4K UHD OLED HDR टचस्क्रीन डिस्प्ले आहे. स्क्रिनचे वैशिष्ट्य म्हणजे, युझर कोणत्याही विंडो दुसऱ्या स्क्रिन म्हणजे खाली देण्यात स्क्रिनमध्ये ड्रॅग करू शकतो. या स्क्रीनमध्ये नॅनो बेझल असल्यामुळे युझरला फुल व्ह्यूचा आनंद मिळतो. तसेच, दुसऱ्या स्क्रीनला खालच्या बाजूने कि-बोर्ड लावला आहे आणि त्याच्याजवळ सेंसर असलेला न्यूमॅरिक पॅड देण्यात आला आहे.

 

लॅपटॉपमध्ये 9th जनरेशन इंटेल कोर i9 प्रोसेसर आहे, जे टर्बो कूलिंगसोबत मिळते. यामध्ये लेटेस्ट गेमिंग-ग्रेड एनवीडिया जीफोर्स RTX 2060 ग्राफिक्स आणि ब्लिस्टरिंग फास्ट स्टोरेजचा समावेश आहे. 

 

यामध्ये आपल्याला 32GB DDR4 रॅम मिळेल. पण, लॅपटॉपमध्ये मायक्रो SD कार्डचा सपोर्ट देण्यात आलेला नाही. हा लॅपटॉपमध्ये अॅलेक्सा व्हॉइस सपॉर्टसोबत येते. तसेच कंपनी यासाठी स्टाइलससुद्धा देत आहे. कनेक्टिविटीसाठी यामध्ये 3 USB C-टाइप पोर्ट दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...