Bcci / संध्याकाळी 7 वाजता होणार भारतीय संघाच्या मुख्य कोचच्या नावाची घोषणा, रवी शास्त्रींचे नाव सर्वात पुढे

रवी शास्त्रीच मुख्य कोच पदावर कायम राहण्याची दाट शक्यता

दिव्य मराठी

Aug 16,2019 11:42:28 AM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन कोचच्या नावाची घोषणा आज (शुक्रवार) संध्याकाळी होईल. मुंबईमध्ये कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती 6 शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहे. वर्तमान कोच रवी शास्त्री यांच्याव्यतिरिक्त न्यूझीलंडचे माजी कोच माईक हेसन, ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलराऊंडर टॉम मुडी, वेस्टइंडीजचे माजी ओपनर फील सिमेन्स, भारतीय संघाचे माजी मॅनेजर लालचंद राजपूत आणि भारतीय संघाचे माजी फिल्डिंग कोच रॉबिन सिंग यांना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. परंतु रवी शास्त्रीच मुख्य कोच पदावर कायम राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.


क्रिकेट सल्लागार समितीमध्ये कपिल देव यांच्याव्यतिरिक्त भारतीय संघाचे ओपनर अंशुमन गायकवाड आणि महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी सहभागी आहेत. मीडिया रिपोर्टनुसार वर्तमान कोच रवी शास्त्री यांचा कार्यकाळ पुढे वाढू शकतो.

X