आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना येथील सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधानांवर टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना : देशातील सरकार हे दारुड्यांचे सरकार आहे. दारुड्याला गरज पडल्यानंतर तो घरातील भांडीकुंडी विकतो, प्रसंगी घर विकतो आणि चोरीही करतो. सध्याच्या सरकारने रिझर्व्ह बँकेच्या पैशाला हात घालून हेच सिद्ध केले, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांनी वेडपट पंतप्रधान' असा उल्लेख केला. ते जालना येथील वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी शहरात अलुतेदार-बलुतेदार सत्ता संपादन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.शरदचंद्र वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेस वंचित अाघाडीचे गोविंद दळवी, भीमराव दळे, दीपक डोके यांच्यासह बलुतेदार-अलुतेदारांच्या संघटनांचे राज्यपातळीवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आपल्या भाषणात अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. आज लोकांकडे पैसा आहे, मात्र तो बाहेर काढायला लोक घाबरत आहेत. अापण पैसा बाहेर काढला तर मोदी येईल आणि आपला पैसा घेऊन जाईल, अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. याच भीतीमधून मंदी निर्माण झाल्याचे अॅड.आंबेडकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टाळी देऊन आले. मात्र पंतप्रधान वेडा आहे. एका टाळीमुळे देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. अमेरिकेचे चीनसोबत भांडण सुरू झाल्याने अमेरिकेच्या कापसाला चीनसारखी मोठी बाजारपेठ मिळणार नाही. त्यामुळेच ट्रम्प यांनी ठरवून मोदींना टाळी दिली.

त्यामुळे मोदींची लोकप्रियता वाढेल असे त्यांना सांगण्यात आले. परंतु त्या टाळीच्या बदल्यात अमेरिका त्यांचा जिनिंग केलेला कापूस चार हजार रुपये क्विंटलने भारतात विकेल, अशी अट घालण्यात आली. या कापसाची दोन जहाजे गुजरातच्या बंदरावर पोहोचली आहेत. अमेरिकेचा कापूस चार हजारांत येथे येत असल्याने शेतकऱ्यांना व्यापारी साडेतीन हजार रुपयांपेक्षा अधिक दर देऊच शकणार नाही, असा दावा आंबेडकर यांनी केला. सरकार हे दारुड्यांचे सरकार आहे. दारुडा रस्त्याने चालत असतो तेव्हा त्याला कशाचीच भीती नसते. या सरकारला जाब विचारणारे कुणीच नसल्याने सरकार झिंगलेल्या अवस्थेत चालले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...