आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : जॉन इब्राहिमच्या भूमिकेने सजलेल्या 'बाटला हाऊस' चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी रिलीज होईल. याच दिवशी अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' आणि 'साहो'देखील रिलीज होऊ शकतो. जॉनने या वर्षाबरेाबरच पुढच्या १५ ऑगस्टचीदेखील तयारी केल्याची चर्चा आहे. पुढच्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी त्याचा 'सत्यमेव जयते 2' रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. सूत्रानुसार, 'या चित्रपटाचा पहिला भाग 'सत्यमेव जयते' गेल्या वर्षी रिलीज झाला होता. चित्रपटाने तिकीट खिडकीवर चांगली कमाईदेखील केली होती. त्या वेळी जॉन आणि दिग्दर्शकांनी सांगितले होते.. चांगली स्क्रिप्ट मिळताच दुसऱ्या भागावर काम सुरू करण्यात येईल. आता मिलाप यांनी या कथेचे काम जवळजवळ पूर्ण केल्याची चर्चा आहे. दोघेही या सिक्वेलवर काम करण्यास उत्सुक आहेत. जॉनच्या व्यतिरिक्त या कथेत आणखी काही पात्रदेखील जोडू शकतात. सर्व काही प्लॅननुसार झाले तर लवकरच त्याचे शूटिंगदेखील सुरू होईल.
अजयच्या 'भुज'शी होईल टक्कर
हा चित्रपट पुढच्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी रिलीज झाला तर त्याची अजय देवगणच्या 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया'शी टक्कर होऊ शकते. अजयने काही दिवसांपूर्वीच आपल्या चित्रपटाची घोषणा केली होती.
'आरआरआर'ही होऊ शकतो रिलीज
विशेष म्हणजे एसएस राजामौली यांचा 'आरआरआर'देखील पुढच्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी रिलीज होऊ शकतो. आतापर्यंत या तिन्ही चित्रपटांपैकी भुजविषयीच अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. योगायोगाने 'साहो' आणि 'बाटला हाऊस' दोन्ही चित्रपटांची निर्मिती भूषणकुमार करत आहेत. शिवाय 'सत्यमेव जयते 2' आणि 'भुज'ची निर्मितीही तेच करणार आहेत.
अॅक्शन-थ्रिलर 'अटॅक' ची झाली घोषणा
शनिवारी जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट 'अॅटॅक' चीदेखील घोषणा करण्यात आली. हा एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शन लक्ष्य राज आनंद करतील. शूटिंग या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू होईल. जॉन या चित्रपटाची सहनिर्मिती धीरज वाधवान आणि अजय कपूरसोबत करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.