आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे : पुण्यापासून 51 किमी अंतरावर असलेले जेजुरी हे ठिकाण खंडोबा मंदिरासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या हळदी उत्सवाला दूरवरून लोक येतात. या उत्सवादरम्यान संपूर्ण मंदिर सोन्यासारखे चमकते. याव्यतिरिक्त येथे 42 किलोची तलवार उचलण्याची स्पर्धादेखील होत असते. दरवर्षी भाविक दाताने ही तलवार उचलतात. यावर्षी एका भक्ताने एका व्यक्तीच्या पाठीवर बसून 42 किलो वजनाची तलवार उचलली.
खंडोबाला महादेवाचा अवतार मानले जाते. अशी मान्यता आहे की, पृथ्वीवर मल्ल आणि मणी राक्षसांचा अत्याचार वाढल्यानंतर त्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता. हे मंदिर एका डोंगरावर आहे. येथे पोहोचण्यासाठी भक्तांना सुमारे 200 पायऱ्या चढाव्या लागतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.