आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर आणि भुस्खलनामुळे 17 जणांचा मृत्यू, एका जिल्ह्यात 24 तासात 31 सेमी पावसाची नोंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू(नेपाळ)- येथे मागील 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नेपाळ पोलिसांनी सांगिल्यानुसार, पूरात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण बेपत्ता आहेत. पावसामुळे मुलपानी परिसरातील मोरंगपासून 400 आणि बारापासून 35 कुटुंबीयांचे सुरक्षित स्थानावर स्थलांतर करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. एकट्या सिमरा जिल्ह्यात 24 तासात 31 सेमी पाण्याची नोंद झाली आहे.


 

गृह मंत्रालयने संकटापासून वाचण्यासाठी अलर्ट जारी केले 
मागील अनेक दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे नेपाळमध्ये पूर आणि भुस्खलनाची भीती निर्माण झाली आहे. यामुळे मोठ्या शहरांना जोडण्याऱ्या राजमार्गांवरील प्रवास बंद करण्यात आला आहे. तसेच पावसामुळे अनेक नद्या भरून धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांनाही अलर्ट करण्यात आले आहे.


हवामान निभागाने दिलेल्या माहितीनुसार एकट्या सिमारा जिल्ह्यात मागील 24 तासात 311.9 मिमी (31.19 सेमी) पावसाची नोंद झाली आहे, तर जनकपुर जिल्ह्यात 245.2 मिमी (24.52 सेमी), काठमांडूत 115.2 मिमी (11.52 सेमी) पावसाची नोंद झाली आहे.