आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर..मुंबई तयार झाले सर्वात महागडे पब्लिक टॉयलेट, बांधकामासाठी खर्च केले 94 लाख रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉर्निंग ऑक करणार्‍या नागरिकांना होईल लाभ

बीएमसी करणार देखरेख..

 

मुंबई- मरीन ड्राइव्हवर बांधण्यात आलेल्या सर्वात महाग पब्लिक टॉयलेटचे लोकार्पण येत्या एक ऑक्टोबर रोजी बृहन्‍मुंबई महानगरपाल‍िकेचे (बीएमसी) महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते होईल. टॉयलेटच्या बांधकामासाठी 94 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. एअर इंडिया बिल्डिंगसमोर बांधण्यात आलेल्या आलिशान 5 शीटर टॉयलेटमध्ये महिलांसाठीही व्यवस्था करण्यात आली आहे.
 
प्रति शीट 19 लाख रुपये खर्च
पब्लिक टॉयलेटची देखरेख बीएमसी करणार आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (सीएसआर) धर्तीवर या टॉयलेटचे बांधकाम करण्यात आले आहे. फिलहाल, प्रिन्सेस स्ट्रीट ते एनसीप‍ीदरम्यान टॉयलेट नसल्याने जॉगिंग आणि सायकल चालकांना मोठी समस्येचा सामना करावा लागत होता. टॉइलेटमध्ये बसविण्यात आलेल्या प्रत्येक शीटवर 19 लाख रुपये खर्च करण्‍यात आला आहे.

 

काय आहे या टॉयलेटमध्ये खास?
बीएमसीच्या अधिकार्‍याने सां‍गितले की, टॉयलेटच्या छतावर सोलार पॅनल बसविण्यात आले आहे. त्यामाध्यमातून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. हे टॉयलेट पूर्णपणे व्हॅक्यूम आधारित असेल.

बातम्या आणखी आहेत...