आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवकाशीत या वेळी ९८% फटाके पारंपरिक पद्धतीनेच तयार होताहेत, दोन हजारपैकी केवळ ४ जणांकडेच पर्यावरणपूरक फटाके बनवण्याचा परवाना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवकाशीतील फटाका उद्योगात आठ लाख लोकांना रोजगार मिळतो. छायाचित्र: आर. महेश कुमार - Divya Marathi
शिवकाशीतील फटाका उद्योगात आठ लाख लोकांना रोजगार मिळतो. छायाचित्र: आर. महेश कुमार

मनीषा भल्ला 

शिवकाशी - तामिळनाडूमधील मदुराईपासून कन्याकुमारीकडे जाताना राष्ट्रीय महामार्ग ४७ वर शिवकाशी गाव आहे. सातत्याने चालू असणाऱ्या औद्योगिक कार्यामुळे या गावाला मिनी जपान असेही म्हटले जाते. फटाके उद्योग शिवकाशीची ओळख आहे. देशातील ९० टक्के फटाके इथेच बनतात. भिंतीवर लागलेले पोस्टर्स तुम्ही फटाक्यांच्या जगात असल्याचे सांगतात. परंतु यामध्ये पर्यावरणपूरक फटाक्यांचे एकही पोस्टर नाही. कारण इथे २ टक्क्यांपेक्षा कमी पर्यावरणपूरक फटाके बनवले जातात. येथे ९८ टक्के जुन्या पध्दतीनुसार बनवले जातात. वास्तविक, येथे फक्त चार कंपन्यांनाच फटाके बनवण्याचा परवाना देण्यात आला आहे. ज्या रसायनांवर बंदी आहे, त्यांचा पर्यावरणपूरक पर्याय पोटॅशियम पेरियोडेट ४०० पटीने महाग आहे. ज्यामुळे निर्मात्यांनी कमी पर्यावरणपूरक फटाके बनवले आहेत. 

शिवकाशीमध्ये सध्या सर्व ठिकाणी फटाके दिसतात. दिवाळीमुळ‌े पुरवठा करण्याच्या कामाला वेग मिळाला आहे. शिवकाशीमध्ये नोंदणीकृत निर्मात्यांची संख्या १७०० आहे. लहान-मोठे मि‌ळून १८०० ते २००० कारखाने फटाके बनवतात. गेल्या वर्षी येथे फटाके व्यवसायाचे उत्पन्न ६५०० कोटी रुपये होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांमुळे उत्पन्नामध्ये सातत्याने घट होत आहे. गेल्या पाच वर्षांत उत्पन्न ६० टक्के कमी झाले आहे. शिवकाशीमधील कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव अधिकारी डॉ. करुणामय पांडे सांगतात, सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ६ रसायनांवर बंदी घातली आहे. यामध्ये बेरियम नायट्रेट, एंटीमोनी, लिथियम, मर्करी, आर्सेनिक आणि लेडचा समावेश आहे. बेरियम नायट्रेट सर्वात घातक असून यावर सक्तीने बंदी घातली आहे. श्रीबालाजी फायर वर्क्सचे मालक कनन म्हणतात, आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. यामुळेच पर्यावरणपूरक फटाक्यांचा परवाना काढला आहे, परंतु स्वस्त बेरियम नायट्रेट शिवाय पर्यावरणपूरक फटाके बनवणे न परवडणारे आहे. कनन सांगतात की, बेरियम नायट्रेटशिवाय पर्यावरणपुरक फटाक्यांमध्ये फुलबाजी, झाड, पेन्सिल, चक्री, माळ बनवले जाऊ शकतात. मात्र, त्यांची मागणी कमी असते. जर ते विकले गेले नाहीत तर मग नुकसान होऊ शकते. ७० रुपये किलो दराच्या बेरियम नायट्रेटऐवजी ३००० रुपये किलोचे पाेटॅशियम पेरियाेडेटचा वापर करण्यात सांगितले आहे, तीच मोठी समस्या आहे. यामुळे पर्यावरण पुरक फटाक्यांची किंमत एवढी जास्त होईल की त्यांना कोणी विकत घेणारच नाही. नॅशनल एनव्हायरनमेंट  इंजिनिअरिंग रिसर्च इंस्टीट्युट (निरी)चे मुख्य शास्त्रज्ञ डाॅ. साधना रायालू सांगतात की, हरित फटाक्यांवर संशोधन सुरू आहे. शिवकाशीत २५० उत्पादकांनी फॉर्म्युल्यासाठी अर्ज केले होते. ज्यातील १६५ उत्पादकांशी करार करण्यात आला. 

पेट्रोलिअय, एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायजेशन (पेसो)कडून  शिवकाशीतील ४ उत्पादकांना परवाने मिळाले आहेत. यावर शिवकाशीचे काँग्रेस खासदार मणिकम टॅगोर सांगतात की, लोकसभा निवडणुकीच्या आधी चार महिने शिवकाशीत न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध बंद पाळण्यात आला होता. यावर्षीही कोणते फटाके बनवायचे याबाबत स्पष्टता नव्हती. निरीने जेव्हा फॉर्म्युला दिला तेव्हा कमी वेळेत पर्यावरणपुरक फटाके बनणे अवघड होते. काय करायचे आहे याबाबत संस्थानाही माहिती नाही.
 

हे फटाके लक्ष वेधतील
> शिवकाशीत यावेळी पर्यावरण पर्यावरणपुरक फटाक्यांपेक्षा वेगळ्या फटाक्यांवर काम करण्यात येत आहे. मोरको सारखी आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांचे अनेक प्रकार यावेळी दिसतील. जॅक अँड जिल, ग्लेजी बूम आणि जोडियक जिग्लर्स सारखे १०० शॉट्सचे फटाकेही जास्त शॉट्ससोबत दिसतील. 

भविष्याची चिंता
> शिवकाशीतील सर्वात जुनी तामिळनाडू फायरवर्क्स, अमोर्सेस मॅन्युफॅक्चरर असोएसिएशनचे अध्यक्ष गणेशन यांना शिवकाशीच्या भविष्याची चिंता भेडसावतेय. त्यांना भीती आहे की, पर्यावरणपुरक फटाक्यांमुळे व्यवसाय बंद झाल्यास आर्थिक व सामाजिक स्थिती बिघडेल. स्थलांतरही वाढेल.

बातम्या आणखी आहेत...