आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 25 व्या वर्षी कुटुंब सोडून स्वामी विवेकानंद बनले विश्व प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. 1863 मध्ये कोलकाता येथे विवेकानंद यांचा जन्म झाला. त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. वडील विश्वनाथ हे कोलकाता हायकोर्टात वकील होते. त्यांची आई भुवनेश्वरी देवी धार्मिक विचारांची महिला होती. स्वामी विवेकानंद यांनी वयाच्या 25 व्या वर्षी कुटूंब सोडले आणि संन्यास धारण केला. स्वामी विवेकानंद प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु होते.  स्वामींजींचे विचार आत्मसात करून कोणताही व्यक्ती जीवनात सकारात्मक बदल प्राप्त करू शकतो. 1893 मध्ये अमेरिकेत शिकागो येथे विश्व धर्म महासभा झाला होती. यामध्ये विवेकानंद यांनी भाषण केले होते. त्यांच्या भाषणाच्या प्रभावाने अनेक इंग्रज लोक भारतीय संस्कृतीने प्रभावित झाले आणि अध्यात्मिक सुखासाठी भारतात आले. येथे जाणून घ्या, स्वामी विवेकानंद यांचे काही खास विचार, ज्यामुळे तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकता.

  • स्वामीजींचे विचार...

> आपण जेवढे जास्त कष्ट करतो, यश तेवढेच उज्वल राहते. > कोणत्याही प्रकराची भीती आणि अपूर्ण इच्छा सर्व दुःखाचे कारण आहे. > स्वतःला कमजोर किंवा लहान समजणे हेच सर्वात मोठे पाप आहे. > ज्या दिवशी कामामध्ये कोणतीही समस्या येणार नाही त्यादिवशी समजून घ्यावे की, आपण चुकीच्या मार्गावर आहोत. > जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत तोपर्यंत देवावरही विश्वास ठेवू शकत नाहीत. > सुख आणि दुःख हे दोघेही चांगले शिक्षक आहेत, आपल्याला नेहमी शिकवत राहतात. > ज्या गोष्टी शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक रूपात आपल्याला कमजोर बनवतात, त्यांचा लगेच त्याग करावा. > जेव्हा मनाचे आणि मेंदूचे ऐकण्याची गरज पडेल तेव्हा सर्वात पहिले मनाचे ऐकावे. > अनुभव हा सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. > स्वतःसाठी सगळेच जगतात, इतरांसाठी जगणे हेच जीवन आहे.

बातम्या आणखी आहेत...