आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या ७० व्या वर्षी ११ हजार फूट उंचीवर सायकल स्पर्धेत सहभाग; मुलाच्या मृत्यूच्या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी स्पर्धेचा घेतला आधार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 सुक्रे - हिंमत करणाऱ्यांसाठी वयाचा अडथळा कधीही येऊ शकत नाही. बाेलिव्हियाच्या ७० वर्षीय मिरथा मुनाेज यांनी ही गाेष्ट सिद्ध करून दाखवली आहे. त्यांनी जगातील सर्वात धाेकादायक नाॅर्थ यंगास मार्गावर ६० किमी सायकल चालवून जिंदादिली दाखवून दिली. बाेलिव्हियातील हा मार्ग ११ हजार फूट उंचीवर असल्याने जाेखमीचा मानला जाताे. संपूर्ण मार्ग जंगलातून जाताे.  हा मार्ग अत्यंत अरुंद व घसरणीचा आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी कठडेदेखील नाहीत. येथे सातत्याने प्रचंड पाऊस व बर्फवृष्टी हाेत असते. भूस्खलनही हाेते. अशा धाेकादायक मार्गाची राेड आॅफ डेथ अशी आेळख आहे. हा मार्ग १९३० मध्ये तयार केला हाेता. तेव्हापासून या मार्गावर हजाराे लाेकांचा मृत्यू झाला तरीही मिरथा यांचे धैर्य खचले नाही. त्यांनी या मार्गावर ६० किमी स्पर्धेत सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला आणि ही शर्यत पूर्णही केली. मिरथा यांनी कुटुंब व एका मानसशास्त्रज्ञ मित्राच्या सल्ल्यावरून सायकल खरेदी केली हाेती. त्यांच्या या निर्णयामागे मुलाच्या मृत्यूची वेदना हाेती. सायकल स्पर्धेने मला वेदना सहन करणे व पुन्हा स्वत:ला उभे राहण्याची हिंमत दिली. ही आवड खूप जुनी आहे. स्पर्धा  कामगिरी ठरली. परंतु विजय किंवा पराभव हा काही उद्देश नव्हता. ११ हजार फूट उंचीवर सायकल चालवणे कठीण काम आहे. मात्र, अशक्य मुळीच नाही, अशी प्रतिक्रिया मिरथा यांनी दिली. आम्ही वर, वर जात हाेताे. विश्रांती नव्हती. परंतु शर्यत पूर्ण झाल्यानंतर आनंद वाटू लागताे.   

सहा नातवांसोबत मजा
मिरथा स्कायरेसच्या संस्थापक सदस्य आहेत. सहा नातवांसोबत सायकल चालवण्यात खरी मजा येते, असे त्यांनी सांगितले. त्यांची एक नात १८ वर्षांची आहे. मिरथा यांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. नवीन पिढी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जात आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

बातम्या आणखी आहेत...