आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याने 84 व्या वर्षी मिळवली अमेरिकेत पदवी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास- अमेरिकेतील टेक्सास शहरात राहणाऱ्या जेनेट फीन यांनी निवृत्तीनंतर कंटाळवाणे आयुष्य जगण्यापेक्षा शिकण्याला प्राधान्य दिले. ऑनलाइन अभ्यास करुन त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी चक्क पदवीही मिळवली. जेनेट  हे अमेरिकी सैन्यात कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते कुटुंबीयांसमवेत राहत होते. पुढे काही कारणावरून ते आजारी पडले. या आजारपणात त्यांचे पाय गेले. तेव्हापासून ते व्हील चेअरवर आहेत. २०१५ मध्ये त्यांनी पदवीचा अभ्यास सुरू केला. आता त्यांना पदवीधारक असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...