आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रँड हयात हॉटेलमध्ये सर्व 162 आमदार हजर, एकजूट राहण्याची सर्वांनी घेतली शपथ  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारपासून बेपत्ता असलेले राष्ट्रवादीचे तीन आमदार सोमवारी दिल्लीवरून मुंबईला परतले

मुंबई- महाराष्ट्रातील राजकारण सध्या वेगवेगळी वळणं घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आमदार फुटाफुटीची भीती काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या 162 आमदारांची परेड ग्रँड हयात हॉटेलमध्ये घेण्यात आली. तसेच, यावेळी त्यांना आम्ही एकजूटीने राहू अशी शपथही देण्यात आली.

यापूर्वी, रविवार-सोमवार सुनावनी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शनिवारी गुपचुप पार पडलेल्या शपथ ग्रहणविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून शनिवारी रात्री सुप्रीम कोर्टात गेले होते. दुसरीकडे संसदेतही याप्रकरणावर जोरदार प्रदर्शन झाले.  महाराष्ट्रात फ्लोर टेस्टवरुन सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावनीदरम्यान शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना 162 आमदारांचे समर्थन पत्र सोपवले. दरम्यान, तिन्ही पक्षाने आधी सुप्रीम कोर्टात 154 आमदारांचे शपथपत्र दिले, जे त्यांना परत घ्यावे लागले. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पक्षापासून फारकत घेऊन उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवारांच्या भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले, अजित पवारांच्या वागणुकीमागे माझा हात नाहीये.

आम्ही सरकार स्थापन करू- शरद पवार
 
शरद पवार म्हणाले की, भाजपला समर्थन देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे हा अजित पवारांचा वयक्तिक निर्णय होता, यात पक्षाचा काहीच हात नाहीये. अजित पवारांच्या बंडखोरीमागे माझा काहीच हात नाहीये. माझा त्यांच्याशी काहीच संपर्क झालेला नाहीये. त्यांची पक्षातून हकालपट्टी करायची का नाही, हा पक्षातील सर्व नेते मिळून घेतील. यात काही दुमत नाहीये की, राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करेल.

बातम्या आणखी आहेत...