Tata Sky / टाटा स्कायने आपल्या सेट-टॉप बॉक्सच्या किमतीत केली 400 रूपयांची कपात, नवीन किमती फक्त 1600 पासून सुरू

नवीन किंमतीसोबत नवीन चॅनल्सचे पॅक देखील केले सादर 
 

दिव्य मराठी

May 24,2019 02:39:00 PM IST


गॅजेट डेस्क - टाटा स्कायने आपल्या डीटीएच सेट टॉप बॉक्सची किंमत 400 रूपयांनी कमी केली आहे. एचडी आणि एसडी या दोन्ही बॉक्सवर ही कपात करण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, सेट टॉप बॉक्सच्या किमती कमी केल्यामुळे देशातील राहिलेल्या ठिकाणी देखील लोकांना सेट-टॉप खरेदी करण्यात मदत होईल. नवीन किमतीचे सेट-टॉप बॉक्स ऑनलाइन बुक करू शकतात. याशिवाय रिेटल स्टोरवरून तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.


टाटा स्काय सेट-टॉप बॉक्सची नवीन किंमत
टाटा स्कायच्या एचडी सेट-टॉप बॉक्स आता 1,800 रूपयांना खरेदी करता येणार आहे. तर एसडी सेट-टॉप बॉक्स फक्त 1,600 रूपयांना मिळणार आहे. कंपनी या नवीन किंमतीच्या आधारे भारतीय बाजारपेठेत एअरटेल, डिश टीव्ही यांसारख्या डीटीएच सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांना टक्कर देवू पाहत आहे. सध्या टाटा स्काय सेट-टॉप बॉक्सच्या किंमती एअरटेल डिजिटल टीव्हीच्या सेट-टॉप बॉक्स इतकी झाली आहे.

49 रूपयांचे नवीन चॅनल्स पॅक
टाटा स्कायने राज्यांनुसार नवीन चॅनल्सचे पॅक जारी केले आहे. या नवीन पॅक किंमत 49 रूपयांपासून सुरू होते. टॅक्स मिळून ही किंमत 57.80 रूपये होते. कंपनीने जारी केलेल्या नवीन चॅनल्स पॅकमध्ये स्टार बंगाली व्हॅल्यू पॅक, स्टार बंगाली बंगाली व्हॅल्यू बी पॅक, स्टार बंगाली प्रिमियम ए स्टार पॅक आणि स्टार बंगाली प्रिमियम बी पॅकचा समावेश आहे.

सर्व चॅनल्सचे पॅक आणि किमती

स्टार बंगाली पॅक चॅनल्स टॅक्ससहित किंमत
व्हॅल्यू ए पॅक 14 57.8 रूपये
व्हॅल्यू बी पॅक 14 57.8 रूपये
प्रीमियम ए पॅक 17 93.2 रूपये
प्रीमियम बी पॅक 21 100.30 रूपये
X