Crime / आमदार त्र्यंबक भिसे यांच्या पुत्राला भोसकले, गंभीर जखमी

आमदार त्र्यंबक भिसे यांचा मुलगा विश्वजीत याला भावकीतीतील काही मंडळींनी मारहाण करून त्याच्या पोटात चाकू खुपसला.

प्रतिनिधी

Jun 05,2019 09:34:00 AM IST

लातूर - लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे यांचा मुलगा विश्वजीत याला भावकीतीतील काही मंडळींनी मारहाण करून त्याच्या पोटात चाकू खुपसला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून काही आरोपींना अटक केली आहे.


भोकरंबा (ता. रेणापूर ) येथील रहिवासी आमदार त्र्यंबक भिसे यांची पिढीजात शेती आहे. गावात भिसे कुटुंबांची मोठी संख्या असून अनेकांची आपापसात भांडणे आहेत. त्र्यंबक भिसे यांच्या शेत जमिनीचाही भावकीतील काहींशी वाद आहे. सोमवारी रात्री त्र्यंबक भिसे यांचे चिरंजीव विश्वजीत यांनी या शेतात नांगरटीसाठी ट्रॅक्टर नेला होता. हे कळताच भावकीतील अनेक जण तेथे पोहोचले. प्रारंभी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. त्यातील एकाने विश्वजीत भिसे यांच्या पोटात शस्त्राने वार केला. त्यानंतर आरोपी पळून गेले. विश्वजित यांना लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असली तरी धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

X
COMMENT