आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Atal Bhujal' Launched By PM Narendra Modi, 7 States To Benefit From The Prime Minister's This Scheme

'अटल भूजल'चा मोदींच्या हस्ते शुभारंभ, माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त याेजना, 7 राज्यांना लाभ होणार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली / लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते बुधवारी अटल भूजल याेजनेचा शुभारंभ झाला. त्याचा महाराष्ट्रासह देशातील ७ राज्यांतील ८ हजारांहून जास्त गावांना लाभ मिळणार आहे.

२०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पाेहाेचवण्याचा संकल्प करण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका निभावणारी ही याेजना ठरणार असल्याचा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सात राज्यांतील ८ हजार ३०० हून जास्त गावांना भूजल पातळीत वाढ करून देण्यासाठीचा हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू झाला आहे. त्याला अटल भूजल याेजना असे नाव देण्यात आले आहे.


याेजनेचा लाभ महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरातच्या एकूण ७८ जिल्ह्यांतील भूजल पातळीत वाढ करण्यासाठी हाेणार आहे. पंचायत क्षेत्रातील भूजल पातळीची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्याचा माेठा फटका तेथील लाेकांना बसू लागला आहे. लाेकांची या संकटातून सुटका व्हावी. भूजल पातळीत वाढ व्हावी. त्यासाठी जनजागृती अभियान चालवावे लागणार आहे, असे माेदी यांनी याप्रसंगी सांगितले. 

'अटल टनेल' ची घाेषणा : हिमाचलला केंद्राची भेट

वाजपेयींच्या जयंतीच्या निमित्ताने माेदींनी देशातील जनतेला भेट देतानाच हिमाचल प्रदेशातील लडाख तसेच जम्मू-काश्मीरला जाेडणाऱ्या राेहतांग बाेगद्याचे नामकरण 'अटल टनेल' असे केल्याची घाेषणा या वेळी केली. हिमाचल प्रदेशातील लाेकांसाठी ही छाेटी भेट आहे. या बाेगद्याचे महत्त्व वाजपेयींनी लक्षात घेतले हाेते. म्हणूनच ते साकारू शकले. त्यांनी हा मार्ग प्रशस्त केला हाेता, याचे स्मरण याप्रसंगी माेदींनी केले. ८.८ किमी लांबीचा हा बाेगदा समुद्रसपाटीपासून ३ हजार मीटर उंचीवर असलेला जगात सर्वाधिक लांबीचा बाेगदा ठरणार आहे. या बाेगद्यामुळे मनाली आणि लेह यांच्यातील अंतर ४६ किलाेमीटरने कमी हाेईल.

हिंसाचार करणाऱ्यांनी कृत्यावर विचार करावा : मोदी

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले. विरोधाच्या नावावर झालेल्या हिंसाचारात सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाला. असे कृत्य करणाऱ्या लोकांनी आपला मार्ग योग्य होता का? याचा जरुर विचार करावा, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, अमेरिकेत सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ भारतीय- अमेरिकी नागरीकांच्या संघटनांनी वेगवेगळ्या रॅली काढल्या. आणखी सात ठिकाणी मार्च काढण्यात येणार आहे.जाधवपूर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात एम.ए.ची पदवी स्वीकारल्यानंतर एका विद्यार्थीनीने सीएएची प्रत फाडली. इंटरनॅशनल रिलेशनची विद्यार्थीनी देबोस्मिा चौधरीने सांगितले- विरोधाची ही माझी पद्धत आहे.

३.५ लाख काेटी रुपये खर्च करणार

केंद्र व राज्य सरकारे मिळून आगामी पाच वर्षांत जल क्षेत्रासाठी सुमारे ३.५ लाख काेटी रुपये खर्च करणार आहेत. देशाच्या राजधानीत गेल्या महिन्यात इंडियन स्टँडर्ड॰सने केलेल्या पाहणीत पाण्याची गुणवत्ता सर्वात वाईट असल्याचे आढळून आले हाेते.
 
25 फुटांचा पुतळा : लखनऊमध्ये मोदींच्या हस्ते अटलजींच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण झाले.

बातम्या आणखी आहेत...