आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आता आपल्यामध्ये नाहीत. अशावेळी अटलजी आणि महाकवी गोपालदास 'नीरज' यांच्याशी संबंधित एक किस्सा व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार 2009 मध्ये नीरज यांनी भविष्यवाणी केली होती की, त्यांच्या आणि वाजपेयींच्या निधनामध्ये एक महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसेल. वास्तवामध्ये त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. नीरज यांचे 19 जुलैला निधन झाले आणि 29 दिवसानंतर अटल बिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्टला निधन झाले. एवढेच नाही तर नीरज यांनी असेही सांगितले होते की, आयुष्याच्या शेवटी आमच्या दोघांनाही गंभीर आजारांचा सामना करावा लागेल, त्यांची ही गोष्टही खरी ठरली.
सोबत शिक्षण घेतले होते
महाकवी गोपालदास 'नीरज' आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी कानपुरच्या डीएव्ही कॉलेजमधून शिक्षण घेतले होते. या काळात दोघांची भेट झाली. नीरज महाकवी असण्यासोबतच ज्योतिष शास्त्रामध्ये पारंगत होते, महाकवी नीरज यांनी कुंडलीच्या आधारे सांगितले होते की, आम्ही दोघेही आपापल्या क्षेत्रामध्ये उच्च शिखरावर जाणार आहोत. नीरज यांनी सहित क्षेत्रामध्ये प्रसिद्धी मिळवली आणि त्यांचे गाणे जगभरात प्रसिद्ध झाले. यासोबतच अटलजी राजकारणात उच्च शिखरावर पोहोचले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.