आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यातील काही काळ नैराश्यामध्ये गेला. त्यांना वाटले की आता सर्वकाही संपले. अटलजी आणि राजकुमारी कौल यांचा विषय कधीच चर्चेमध्ये राहिला नाही, परंतु २०१४ मध्ये राजकुमारीचे निधन झाल्यानंतर इंडियन एक्स्प्रेसने अशी बातमी छापली की- 'राजकुमारी अटलजींचा आधार होत्या. वरिष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनीही या दोघांच्या संबंधांना राजकारणातील समोर न आलेली सुंदर प्रेमकथा म्हटले होते. जाणून घ्या, या कथेविषयी...
- या कथेची सुरुवात 40 च्या दशकात होते, जेव्हा अटलजी ग्वालियरच्या एक कॉलेजमध्ये शिकत होते. येथेच त्यांची भेट राजकुमारी कौल यांच्याशी झाली.
- अटलजी यांच्यावर लिहिण्यात आलेले पुस्तक 'अटल बिहारी वाजपेयीः ए मॅन ऑफ आल सिजन्स' चे रायटर आणि पत्रकार किंशुक नाग यांनी लिहिले आहे की, दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते.
- त्या काळात फक्त डोळ्यांनीच बोलले जायचे, प्रत्यक्ष बोलण्याची संधी फार कमी होती. यामुळे प्रेम झाले तरी लोक आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हते.
राजकुमारीसाठी अटलजींने लिहिले पत्र
- अटलजींने धाडस करत कॉलेज लायब्ररीच्या एक पुस्तकात राजकुमारीसाठी एक पत्र ठेवले. परंतु या पत्राचे उत्तर त्यांना मिळाले नाही.
- वास्तवामध्ये राजकुमारीने पुस्तकामध्ये उत्तर दिले होते, परंतु ते अटलजींपर्यंत पोहोचू शकले नाही. या दरम्यान राजकुमारीचे लग्न कॉलेजचे एक प्रोफेसर ब्रिज नारायण कौल यांच्याशी ठरले.
- पुस्तकामध्ये राजकुमारीच्या एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे की, राजकुमारींना अटलजीसोबत लग्न करायचे होते, परंतु घरामध्ये खूप विरोध झाल्यामुळे असे घडू शकले नाही.
...आणि अटलजींने कधीही लग्न केले नाही
- राजकुमारी कौल यांच्या लग्नानंतर अटलजींनी कधीही लग्न केले नाही. त्यानंतर ते राजकारणात आले आणि पुढे चालत राहिले. परंतु पंधरा वर्षानंतर ते दोघे पुन्हा भेटले. तेव्हा अटलजी खासदार होते.
- मिसेस कौल यांचे पती दिल्ली युनिव्हर्सिटीच्या राजमस कॉलेजमध्ये फिलॉसॉफीचे प्रोफेसर होते. त्यानंतर याच कॉलेजच्या हॉस्टेलचे वॉर्डन बनले. त्यानंतर अटलजीसुद्धा त्यांच्यासोबत राहण्यासाठी आले होते.
- मोरारजी देसाई सरकारमध्ये अटलजी परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर कौल कुटुंब लुटियंस झोनमध्ये त्यांच्यासोबत राहत होते. मिसेस कौल नेहमी सोबत राहायच्या. परंतु याविषयी दोघांनीही कधीही चर्चा केली नाही.
- पत्रकार कुलदीप नय्यर यांनी टेलिग्राफमध्ये लिहिले होते की, 'मिसेस कौल अटलजींसाठी सर्वकाही होत्या. अटलजींनी ज्याप्रकारे त्यांची सेवा केली, तशी सेवा कदाचित इतर कोणीही केली नसती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.