आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Atal Bihari Vajpayee Ashes Immersed Haridwar Ganga Bjp Amit Shah Rajnath Live Updates

अटलजींच्या अंत्ययात्रेत अतिरेकी हेडलीचा भाऊ? डेनियल उपस्थित असल्याचे केंद्र सरकारने केले मान्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शुक्रवारी दिल्लीत निघालेल्या अंत्ययात्रेत पाकिस्तानसह इतर अनेक देशांतील शिष्टमंडळे सहभागी झाली हाेती. काही प्रसारमाध्यमांच्या सूत्रानुसार, मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडली याचा सावत्र भाऊ डेनियल गिलानी हाही या वेळी पाकिस्तानच्या शिष्टमंडळात सहभागी हाेता. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व पाकिस्तानचे प्रभारी कायदा व सूचना मंत्री अली जाफर यांच्यात झालेल्या बैठकीतही डेनियलची उपस्थिती हाेती. 


केंद्र सरकारने मात्र या वृत्ताचे खंडन करतानाच सुषमा स्वराज यांच्यासाेबत झालेल्या बैठकीस मात्र डेनियल उपस्थित असल्याचे मान्य केले अाहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, डेनियल हे पाकिस्तानातील नागरी सेवा अधिकारी अाहेत. तसेच तेथील सूचना मंत्री कार्यालयाचे संचालक व चित्रपट सेन्साॅर बाेर्डाचे अध्यक्षही अाहेत. याच पदामुळे त्यांचा शिष्टमंडळात समावेश हाेता. डेनियल यांनी यापूर्वी अनेकदा हेडलीशी अापला काहीही संपर्क नसल्याचे स्पष्ट केलेले अाहे. दरम्यान, हरिद्वारमधील गंगा नदीत रविवारी वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...   

 

बातम्या आणखी आहेत...