आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Profile: शिक्षकाच्या घरी जन्मले, तिनदा पंतप्रधान, अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवन परिचय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - स्वतंत्र भारताच्या दुसऱ्या लोकसभेत भारतीय जनसंघाचे चार खासदार होते. त्‍यांचा परिचय तत्‍कालीन राष्‍ट्रपती एस. राधाकृष्‍णन यांच्‍याशी करून देण्‍यात आला. ते म्‍हणाले की, आपण कोणत्याही भारतीय जनसंघ पार्टीला ओळखत नाही. अटल बिहारी वाजपेयी त्‍या चार खासदारांपैकी एक होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. divyamarathi.com च्‍या या संग्रहातून जाणून घ्‍या, अटल बिहारी वाजपेयी यांच्‍याशी संबंधित काही खास बाबी.


शिक्षकाच्या घरात जन्मले होते वाजपेयी...
> नेहरु-गांधी परिवारातील पंतप्रधानांनंतर अटलजी यांचे नाव भारतातील निवडक नेत्‍यांमध्‍ये घेतले जाते.
> एका शिक्षकाच्‍या घरात जन्‍मलेले वाजपेयी यांचा बालपणीचा काळ सुखद होता.
> 25 डिसेंबर 1924 मध्‍ये ग्‍वाल्‍हेरच्‍या एका मध्‍यमवर्गीय कुटुंबात वाजपेयी यांचा जन्‍म झाला.
> वाजपेयी यांचे प्राथमिक शिक्षण ग्‍वाल्‍हेरच्‍या व्‍हिक्‍टोरिया कॉलेजमध्‍ये झाले. आज हे कॉलेज लक्ष्मीबाई नावाने ओळखले जाते. पुढे त्‍यांनी कानपुरमध्‍ये शिक्षण घेतले.
> राज्‍यशास्‍त्र विषयात त्‍यांनी पीजी केले आणि पत्रकारितेतून करियरला सुरुवात केली. त्‍यांनी राष्ट्र धर्म, पांचजन्य आणि वीर अर्जून या पत्रांचे संपादनही केले.


पहिल्‍यांदा बलरामपुरातून जिंकली निवडणूक
> 1951 मध्‍ये वाजपेयी भारतीय जन संघाचे संस्थापक सदस्य होते. 1957 मध्‍ये जनसंघाने निवडणूक लढवली.
> वाजपेयी लखनऊमध्‍ये निवडणूक हरले होते. मथुरेतूनही त्‍यांना पराभव स्‍विकारावा लागला. मात्र, बलरामपूरमधून जिंकून ते दुस-या लोकसभेत पोहोचले होते.
> पुढील पाच दशकांमधील संसदीय करियरची त्‍यांची ही सुरूवात होती.
> 1977 मध्‍ये ते जनता पार्टीच्‍या सरकारमध्‍ये परराष्ट्र मंत्री होते.
> याच दरम्‍यान त्‍यांनी संयुक्त राष्ट्र अधिवेशनात हिंदीमध्‍ये भाषण दिले होते. 1980 मध्‍ये ते भाजपाचे संस्‍थापक सदस्‍य होते.
> 1980 ते 1986 पर्यंत ते भाजपाचे अध्‍यक्ष राहिले.
> वाजपेयी आतापर्यंत 9 वेळा लोकसभेत निवडूण गेले.
> 1984 मध्‍ये त्‍यांना काँग्रेसचे माधवराव सिंधिया यांनी लोकसभा निवडणूकीत पराभूत केले.
> 16 मे 1996 ला पहिल्‍यांदा ते पंतप्रधान झाले. लोकसभेत बहुमत सिद्ध न झाल्‍याने त्‍यांना 31 मे 1996 मध्‍ये त्‍यागपत्र द्यावे लागले.
> 1998 पर्यंत ते लोकसभेत विरोधी पक्षाचे नेते राहिले. 
> वाजपेयी यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ भारतासाठी सोनेरी ठरला.


तीनदा भूषविले देशाचे पंतप्रधान पद
अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषविले आहे. ते पहिल्यांदा फक्त 13 दिवसांचे पंतप्रधान बनले होते. 1996 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान बनले. यानंतर ते 1998 ते 1999 पर्यंत 13 महिन्यांचे पंतप्रधान बनले होते. मग, यानंतर ते पुन्हा 5 वर्षांपर्यंत देशाचे पंतप्रधान राहिले होते. 


पुढील स्‍लाइड्सवर पाहा, वाजपेयी यांचे काही खास फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...