आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठन गई! मौत से ठन गई!
मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं,
जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं।
मैं जी भर जिया, मैं मन से मरूं,
लौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूं...
- १९८८ मध्ये किडनीच्या उपचारासाठी अमेरिकेला गेले होते, तेव्हा अटलजींनी धर्मवीर भारतींना एका पत्रात मृत्यूचा पराभव करण्याच्या निर्धारावर ‘मौत से ठन गई’ कविता लिहिली होती. या चार ओळी त्याच कवितेतील.
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. प्रदीर्घ आजारानंतर गुरुवारी सायंकाळी ५.०५ वाजता त्यांनी ‘एम्स’मध्ये अंतिम श्वास घेतला. शुक्रवारी त्यांच्या मानसकन्येने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. ९४ वर्षीय अटलजी ११ जूनपासून तेथे दाखल होते.
नऊ आठवड्यांपासून त्यांची प्रकृती स्थिर होती, पण शेवटच्या ३६ तासांत प्रकृतीत सातत्याने घसरण झाली. त्यादरम्यान त्यांना जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनाबद्दल सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
गुरुवारी रात्री पार्थिव शरीर कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव शरीर सकाळी ९.०० वाजता भाजप मुख्यालयात आणले जाईल. तेथूनच दुपारी १.०० वाजता अंत्ययात्रा सुरू होईल. दुपारी ४.०० वाजता अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या स्मारकासाठी विजयघाटाजवळ सुमारे दीड एकर जागा देण्यात आली आहे. राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर २००९ पासून त्यांचा अावाज कोणीही ऐकला नाही. स्ट्रोकमुळे त्यांची स्मृती क्षीण झाली होती. त्यानंतर त्यांना स्मृतिभ्रंश झाला. त्यांची फक्त एक किडनीच काम करत होती.
पंतप्रधान म्हणाले मी शून्यात गेलो..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने मी शून्यात गेलो असल्याचे, पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले..
मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं, लेकिन भावनाओं का ज्वार उमड़ रहा है।
— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2018
हम सभी के श्रद्धेय अटल जी हमारे बीच नहीं रहे। अपने जीवन का प्रत्येक पल उन्होंने राष्ट्र को समर्पित कर दिया था। उनका जाना, एक युग का अंत है।
एम्सने मेडिकल बुलेटिन जारी करत निधन झाल्याचे जाहीर केले..
Former Prime Minister & Bharat Ratna #AtalBihariVaajpayee passes away in AIIMS. He was 93. pic.twitter.com/r12aIPF5G0
— ANI (@ANI) August 16, 2018
> सर्वात प्रदीर्घ काळ खासदारपदी राहण्याचा विक्रम : १० वेळा लोकसभेचे आणि २ वेळा राज्यसभेचे खासदार होते, एकूण ५० वर्षे खासदार होते.
> सर्वात प्रदीर्घ राजकीय कारकीर्द :१९५२ ते २००८ पर्यंत, म्हणजे ५६ वर्षे सक्रिय राजकारणात राहिले.
> पहिले गैर-काँग्रेसी पंतप्रधान : जे ५ वर्षे सरकार चालवण्यात यशस्वी ठरले.
तीन वेळा भारताचे पंतप्रधान
> 25 डिसेंबर 1924 मध्ये ग्वाल्हेरमध्ये जन्म. ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये शिक्षण झाले.
> राज्यशास्त्रात पीजी केले आणि पत्रकारितेतून करियरला सुरुवात.
> 1951 मध्ये वाजपेयी भारतीय जन संघाचे संस्थापक सदस्य होते. 1957 मध्ये जनसंघाने निवडणूक लढवली. पुढे नऊ वेळा ते लोकसभेवर निवडून गेले.
> 1977 मध्ये ते जनता पार्टीच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होते.
> 1980 ते 1986 पर्यंत ते भाजपाचे अध्यक्ष राहिले.
> अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषविले आहे. ते पहिल्यांदा फक्त 13 दिवसांचे पंतप्रधान बनले होते. 1996 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान बनले. यानंतर ते 1998 ते 1999 पर्यंत 13 महिन्यांचे पंतप्रधान बनले होते. मग, यानंतर ते पुन्हा 5 वर्षांपर्यंत देशाचे पंतप्रधान राहिले होते.
अंत्यदर्शन : सकाळी ९ वाजेपासून भाजप मुख्यालयात, ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा.
अंत्यसंस्कार : विजयघाटावर आज दुपारी ४ वाजता. दीड एकर जागेवर होणार स्मारक.
> वर्ल्ड मीडिया
न्यूयॉर्क टाइम्स : भारताचे ग्रँडफादर गेले
भारताचे माजी पंतप्रधान वाजपेयी कालवश. अटल यांनी अापल्या कार्यकाळात अणुचाचणीवरील दाेन दशकांची बंदी माेडून जगाला अाश्चर्याचा धक्का दिला हाेता. मात्र पाकिस्तानशी तणाव कमी करण्यात व अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध वाढण्यात यशस्वी ठरले हाेते.
बीबीसी : अटलजींनी देशास ‘न्यूक्लियर पॉवर’ बनवले
भारताला अण्वस्त्र सज्ज बनविणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. त्यांच्या अणुचाचणीमुळे भारत व पाकमध्ये युद्धाचा धाेका निर्माण झाला हाेता. त्यानंतर काश्मीरातील वादग्रस्त भागात भारत- पाकच्या सैन्यामध्ये चकमकी वाढल्या हाेत्या.
पंतप्रधान नरेंद्र माेदी, काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षा साेनिया गांधी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी नवी दिल्लीत अटलजींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.