आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी वयाच्या 94 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या 9 वर्षांपासून आजारी होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली होती. 2009 पासून ते व्हीलचेअरवर होते. अटलजीने लग्न केले नव्हते, परंतु त्यांच्या दत्तक मुलीचे नाव नमिता आहे. अटलजींच्या कुटुंबातील इतर सदस्य मध्यप्रदेशातील ग्वालियर येथे राहतात.
- अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 मध्ये ग्वालियरच्या शिंदे वाडा भागात झाला होता. त्यांचे वडील पंडित कृष्णबिहारी वाजपेयी शिक्षक होते आणि आई कृष्णा देवी घरगुती महिला होत्या.
- अटलजींच्या कुटुंबात त्यांच्या आई-वडिलांव्यतिरिक्त तीन मोठे भाऊ अवधबिहारी, सदाबिहारी आणि प्रेमबिहारी वाजपेयी यासोबतच तीन बहिणी होत्या. अटलजींचे प्राथमिक शिक्षण सरस्वती विद्या मंदिर येथे झाले. या व्यतिरिक्त अटलजींचे अनेक नातेवाईक ग्वालियरमध्ये आहेत. यामध्ये पुतण्या दीपक वाजपेयी, पुतणी कांती मिश्रा आणि भाची करुणा शुक्ला आहेत.
- शिंदे वाडा येथेच अटलजीने आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले, त्यानंतर ग्वालियरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतले.
- कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी राजकारणात काम करण्यास सुरु केले होते. त्यानंतर ते कानपुरला गेले. तेथे त्यांनी डीजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
- राजकारणात यशस्वी होऊनही त्यांनी लग्न केले नव्हते. परंतु 1998 मध्ये ते 7, रेसकोर्स रोडवर राहण्यासाठी गेल्यानंतर त्यांची मैत्रीण राजकुमारी कौलची मुलगी आणि त्यांची दत्तक मुलगी नमिता आणि तिचे पती रंजन भट्टाचार्य यांचे कुटुंबही राहण्यासाठी आले होते.
- राजकुमारी कौल यांच्याविषयी सांगितले जाते की, अटलजी पंतप्रधान असताना कौल वाजपेयींच्या घरातीलच एक सदस्य होत्या. त्यांच्या निधनानंतर वाजपेयींच्या घरातून जी प्रेसनोट जारी करण्यात आली, त्यामध्ये कौल यांना वाजपेयींच्या 'घरातील सदस्य' संबोधित करण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.