आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न आणि 3 वेळा पंतप्रधान राहिलेले अटलबिहारी वाजपेयी (93) यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी 4:56 वाजता राजघाट स्थित राष्ट्रीय स्मृती स्थळावर हिंदू प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. अटलजींच्या दत्तक कन्या नमिता यांनी त्यांना मुखाग्नि दिला. अंत्यसंस्काराशी संबंधित विविध मान्यता प्रचलित आहेत. सामान्यतः शवाचे दाह संकर करताना मृतकाच्या मुखावर चंदनाचे लाकूड ठेवले जाते. अटलजींच्या अंत्यसंस्कारातही चंदनाच्या लाकडाचा उपयोग करण्यात आला. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, अंत्यसंस्कारात चंदनाचे लाकूड का ठेवले जाते.
1. हिंदू परंपरेमध्ये मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करताना त्याच्या मुखावर चंदन ठेवून दाह संस्कार केला जातो. ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. या प्रथेमागे केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिक कारणही आहे. चंदनाचे लाकूड थंड (शीतल) असते.
2. प्राचीन काळी अंत्यसंस्कार चंदनाच्या लाकडामध्येच केले जात होते, परंतु आता चंदनाचे लाकूड खूप महाग झाले आहे. सर्वांसाठी चंदनाचे लाकूड उपलब्ध करणेही अवघड आहे. अशा स्थितीमध्ये सामान्य लाकडाने शवदाह केला जातो आणि चंदनाचे लाकूड तोंडावर ठेवले जाते. अशाप्रकारे चंदनाच्या लाकडाने अंत्यसंस्कारच्या प्रथेचे पालन केले जाते.
3. चंदनाच्या थंड गुणधर्मामुळे शिवलिंगावर चंदन लावले जाते. चंदन लावल्याने आपल्या मस्तकाला थंडावा मिळतो. प्राचीन मान्यतेनुसार शवाच्या मुखावर चंदनाचे लाकूड ठेवून अंत्यसंस्कार केल्याने व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते. मृतकाला यमलोकातही चंदनाप्रमाणे शीतलता मिळते.
4. वैज्ञानिक कारण असे आहे की, मृतकाचे अंत्यसंस्कार करताना मांस आणि हाडे जळताना उग्र गंध (वास) पसरतो. अशा स्थितीमध्ये चंदनाचे लाकूड जाळल्यामुळे या उग्र वासाचा प्रभाव कमी होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.