आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

.. हायजॅकरच्या तावडीतून प्रवाशांना सोडवण्यासाठी स्वतः अपहृत विमानात घुसले होते अटलजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. देशातील राजकीय क्षेत्राचे हे नुकसान कधीही भरून न निघण्यासारखे आहे. वाजपेयी यांचे अनेक किस्से चर्चिले जातात. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण आणि वादग्रस्त निर्णय होता तो, कंधहार विमान अपहरणानंतर दहशतवाद्यांना सोडण्याचा. पण त्यांच्याशी संबंधित आणखी एक विमान अपहरणाचा किस्सा आहे तो फार क्वचित लोकांना माहिती आहे. कंधहार विमान अपहरण प्रकरणापूर्वीचे हे प्रकरण आहे. 


स्वतःचा जीव धोक्यात घालत 48 लोकांचे प्राण वाचवले 
> ही घटना 22 जानेवारी 1992 ची आहे. एका व्यक्तीने दिल्लीकडे उड्डाण घेत असलेले इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले होते. त्यात 48 प्रवासी होते. 
> एका व्यक्तीने हाताला कापड गुंडाळले होते. हातात केमिकल बॉम्ब असल्याचे सांगत त्याने विमान पुन्हा लखनऊला वळण्यास सांगितले. पायलटने पुन्हा विमान लखनऊ विमानतळावर उतरवले आणि ते एका कोपऱ्यात उभे केले. 
> विमान अपहरणाच्या बातमीन एकच गोंधळ उडाला होता. सर्वच धक्क्यात होते, अपहरण कर्त्याला काय हवे आहे कोणालाही माहिती नव्हते. 
> उत्तर प्रदेशात तेव्हा राष्ट्रपती राजवट होती. विरोधी पक्षातील मोठे नाव असलेले वाजपेयी तेव्हा लखनऊमध्ये होते. ते सक्रिट हाऊसमध्ये कार्यकर्त्यांसोबत जेवत होते.
> वाजपेयींनी जेवायला सुरुवात केली तेवढ्यात जिल्हाधिकारी तेथे आले. एका व्यक्तीने विमान अपहरण केले आहे. 48 लोकांचा जीव धोक्यात आहे. अपहरणकर्त्याच्या हातात केमिकल बॉम्ब आहे आणि त्याने अटलबिहारी वाजपेयींना बोलावण्याची मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले. 
> त्यांचे बोलणे संपण्याआधी वाजपेयी ताटावरून उठले होते आणि ते विमानतळाकडे निघाले. एवघा एक घास खाऊन अटलजी निघाले. कार्यकर्त्यांनी त्यांना जेवण करून जाण्यास म्हटले पण ते काहीही न बोलता निघाले. 
> अधिकारी आणि पोलिस अपहरणकर्त्याच्या संपर्कात होते, पण तो फक्त अटल बिहारी वाजपेयी यांच्याशीच बोलणार असे म्हणत होता. तो त्यांना बोलावण्याची मागणी करत होता. 
> वाजपेयी विमानतळावर कंट्रोल रूममध्ये पोहोतचले. ते अपहरणकर्त्याशी बोलले आणि त्याला त्याने बंधक बनवलेल्या लोकांना सोडण्याची विनंती केली. पण त्या अपहरणकर्त्याने वाजपेयींचा आवाज ओळखण्यास नकार दिला आणि बॉम्बने विमान उडवण्याची धमकी देऊ लागला. 
> तो ऐकतच नसल्याने वाजपेयींनी विमानात जाण्याचा निर्णय घेतला. पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना इतर लोक अडवत होते. पण प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने वाजपेयींनी विमानात जाण्याचे ठरवले. प्रशासन परवानगी देत नसल्याने अटलजींनी त्यांच्यावरही दबाव आणला. 
> अखेर वाजपेयीजी विमानाजवळ गेले. पोलिसांनी विमानाला घेराव घधातलेला होता. वाजपेयी विमानात गेले आणि तेव्हा आत बसलेल्या लोकांच्या जीवात जीव आला. 
> वाजपेयी अपहरणकर्त्याच्या अगदी समोर उभे होते. वाजपेयींबरोबर असलेले लालजी टंडन अपहरण कर्त्याला म्हणाले, तुला ज्यांना भेटायचे होते, ते समोर आहेत. तुझे म्हणणे सांगण्याआधी त्यांचा आशीर्वाद घे. 
> अपहरण कर्ता पाया पडण्यासाठी वाकला तेवढ्यात तयारीत असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले. त्याच्या हातात केमिकल बॉम्ब नव्हता. 
> यानंतर विमानात अटल बिहारी वाजपेयींच्या नावाचा जयजयकार सुरू झाला. या विमानात अनेक मोठे राजकीय नेतेही होते. त्यांच्यापैकीच एक होते. काँग्रेसचे कोषाध्यक्ष सीताराम केसरी. 

बातम्या आणखी आहेत...