आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊ-बहिणींना नाही मिळणार अटलजींची पूर्ण प्रॉपर्टी, मृत्युपत्र समोर आल्यास त्यानुसार होईल वाटप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - अटलजींचे पार्थिव भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अटलजी अविवाहित होते. तथापि, 1998 मध्ये जेव्हा ते 7, रेसकोर्स रोडमध्ये राहायला गेले, तेव्हा त्यांच्या मैत्रीण राजकुमारी कौल यांची कन्या आणि त्यांची दत्तक मुलगी नमिता आणि त्यांचे पती रंजन भट्टाचार्य यांचे कुटुंबही सोबत राहण्यासाठी आले होते. असे सांगतात की, जेव्हा अटल पंतप्रधान होते, तेव्हा कौल वाजपेयींच्या कुटुंबाचे सदस्य होते.

 

त्यांच्या निधनानंतर वाजपेयींच्या निवासस्थानातून जे प्रेस रिलीज जारी करण्यात आली होती. त्यात त्यांनी वाजपेयींच्या घरातील सदस्यांना संबोधित केले होते. नमिता ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेज (आता लक्ष्मीबाई) मध्ये वाजपेयींचे वर्गमैत्रीण राहिलेल्या राजकुमारी कौल यांची कन्या आहेत. नमिता यांचा विवाह रंजन भट्टाचार्य यांच्याशी झालेला आहे. त्यांनी अटलजी पीएमपदी राहताना ओएसडीच्या रूपातही कार्य केले होते.

 

अद्याप अटलजींचे मृत्युपत्र समोर आलेले नाही. परंतु सन 2005 मध्ये संशोधित हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार ही संपत्ती त्यांच्या दत्तक कन्या नमिता यांना मिळेल. म. प्र.चे हायकोर्ट अॅडव्होकेट संजय मेहरा सांगतात की, माता-पिता असतील तर माता आणि कन्येला संपत्ती मिळते. आता माता-पिता, पत्नी नाहीत, म्हणून पूर्ण संपत्ती दत्तक कन्येला मिळेल. जर एखादे मृत्युपत्र समोर आले, तर मृत्युपत्रानुसार संपत्तीचे वाटप होईल. तथापि, त्यांच्या ग्वाल्हेरातील पैतृक निवासावर दत्तक मुलीचाच अधिकार असेल.

 
काय म्हणतो कायदा?
- हिंदू दत्तक ग्रहण आणि देखभाल अधिनियम 1956 नुसार, दत्ता घेतल्यानंतर मुलगा/ मुलीचा जैविक कुटुंबावर कोणताही अधिकार नाही राहत.

- ती जैविक पिता किंवा नातेवाइकांना संपत्तीत हिस्साही मागू शकत नाही. 
- दत्तक घेणारे वडील किंवा जवळच्या वंशापासून मुलाला/मुलीला वारसाहक्क प्राप्त होतो.
- ज्या वडिलांनी दत्तक घेतले आहे, त्यांनाही दत्तक अपत्याकडून वडिलांचा अधिकार मिळतो.
- एखाद्याला फक्त तेव्हाच स्वीकारले जाऊ शकते, जेव्हा तो/ती हिंदू असेल आणि पूर्वी दत्तक घेतलेले नसेल.
- एका दत्तक मुलगा/मुलीला संपत्तीमध्ये अधिकार फक्त त्याच्या दत्तक आई-वडिलांच्या संपत्तीचा वारस म्हणूनच मर्यादित असतो.
- त्याचे खऱ्या आईवडिलांना वाटले, तर ते मुलाला गिफ्ट किंवा विलच्या माध्यमातून प्रॉपर्टी देऊ शकतात.

 

एकूण किती संपत्ती होती वाजपेयींची...
- 2004 मध्ये अटलजींनी शेवटचे अॅफिडेव्हिट दिले होते. ज्यानुसार त्यांच्याकडे 20 हजार रुपए केस होते. 
- बँकेत एकूण 29,58,450 रुपये जमा होते. ज्यात 3,82,888 रुपये एसबीआय नवी दिल्ली आणि 25,75562 रुपये एसबीआयच्या सांसद भवन ब्रांचमध्ये जमा होते. 

- एनएसएस आणि पोस्ट सेव्हिंग सारख्या स्किम्समध्ये 1,20,782 रुपये जमा होते.
- दागिने म्हणून त्यांच्याकडे काहीही नव्हते.

 

असेट्स किती?
- दिल्लीत 22 लाख रुपयांचा एक फ्लॅट आहे. 
- ग्वाल्हेरात 180 स्क्वेअर फुटांचा 6 लाख रुपयांचे वडिलोपार्जित घर आहे. 
- त्यांच्याकडे कोणतेही ऋण नव्हते.

 

जमीन किती होती?
- शेतजमीन नव्हती. 
- अकृषिक जमीनही नव्हती.
- स्वत:ची इमारत आहे, परंतु घर नाहीये.

 

 

बातम्या आणखी आहेत...