आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटल जीवन: वयाच्या 15 व्या वर्षी संघाशी जोडले गेले, 33 व्या वर्षी संसदेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
a - Divya Marathi
a

अटलजी वयाच्या १५ व्या वर्षी संघाशी जोडले गेले; १९५७ मध्ये ३३ व्या वर्षी संसदेत गेले, त्यांचे भाषण एेकून नेहरू म्हणाले- भावी पंतप्रधान; नेहरू, इंदिरा गांधींप्रमाणे तीनदा पंतप्रधान झाले

 

शिक्षण 

- इ.५ वीत असताना प्रथमच केले भाषण; कायद्याच्या शिक्षणावेळी वडील हाेते सहाध्यायी

- २५ डिसेंबर १९२४ राेजी ग्वाल्हेरमध्ये जन्म. वडील कृष्णबिहारी शिक्षक हाेते.
- ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया महाविद्यालयातून पदवी घेतली. कानपूरच्या डीएव्ही कॉलेजातून राज्यशास्त्राची पदवी.
- अटलजींनी कायद्याचे शिक्षण वडील कृष्णबिहारींसाेबत घेतले. दोघे साेबतच राहत व काॅलेजला जात. त्यांना हे शिक्षण मध्येच साेडावे लागले.

- अटलजी वर्गात नसत तेव्हा प्राध्यापक विचारत- पंडितजी, साहेबजादे काेठे अाहेत? ते उत्तर देत- खाेलीला कुलूप लावून येतच असतील.

- १९३९ मध्ये संघाशी जोडले गेले. १९५९ मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जींकडून जनसंघाची स्थापना. तेव्हा अटलजी संस्थापक सदस्यांपैकी एक हाेते.

 

राजकारण

- १९५४ मध्ये प्रथमच निवडणुकीत; १९७७ मध्ये परराष्ट्रमंत्री व १९९६ मध्ये पीएम

- १९५४ मध्ये लखनऊतून लोकसभा निवडणूक लढले; परंतु हरले. १९५७ मध्ये लखनऊ, मथुरा व बलरामपूरमधून लढले. बलरामपूरमधून संसदेत गेले. त्या वेळी ३३ वर्षीय अटलजी सर्वात तरुण खासदार हाेते.

- १९६२ मध्ये राज्यसभेतून संसदेत. १९७५ मध्ये पीएम इंदिरा गांधींनी अाणीबाणी लागू केल्यानंतर अटलजींना कारागृहात जावे लागले.

- 1977 मध्ये परराष्ट्रमंत्री बनले. याच वर्षी यूएनमध्ये हिंदीत केले भाषण.

- १९८० मध्ये भाजपचा पाया रचला. १९८४ मध्ये निवडणूक हरले.

- १९९६मध्ये प्रथमच पीएम. १३ दिवसच चालले सरकार. १९ मार्च १९९८ला पुन्हा पीएम बनले.

- पुन्हा १३ मार्च १९९९ राेजी तिसऱ्यांदा. ५ वर्षे पहिले गैरकाँग्रेसी सरकार चालवले.
- २००५ मध्ये सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली.

 

शेवटची १० वर्षे मौन राहिले

- फेब्रुवारी २००९ मध्ये स्ट्रोकनंतर रुग्णालयात दाखल करावे लागले. मार्चमध्ये डिस्चार्ज मिळाला; परंतु त्यांचा आवाज गेला हाेता.
- २५ डिसेंबर २०१४ राेजी त्यांच्या ९० व्या जन्मदिनी ‘सुशासन दिवस’ साजरा करण्याची घोषणा.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, अटलजींचे बालपणाचे व कधीही न पाहिलेले इतर फोटो...

 

 

बातम्या आणखी आहेत...