आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई: अटल बिहारी वाजपेयी आता आपल्यात नाहीत. 16 ऑगस्ट 2018 रोजी एम्समध्ये दिर्घ उपचारानंतर त्यांचे निधन झाले. अटलजी फक्त राजकारणापुरते मर्यादीत नव्हते. तर बॉलिवूडमध्येही त्यांचे अनेक चाहते होते. आज आम्ही तुम्हाला अटलजी यांचे श्रीदेवी, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान, हेमा मालिनी, अनिल कपूर, विनोद खन्ना, देवानंदसोबतच इतर फिल्म स्टार्ससोबतच्या काही सुंदर आठवणी दाखवणार आहोत.
94 व्या वाढदिवशी रिलीज होणार होता बायोपिक युगपुरुष अटल
कवी, राजकारणी आणि भारतरत्न अटल बिहारी यांच्या 93 व्या वाढदिवशी डायरेक्टर मयंक पी श्रीवास्तव यांनी एका बायोपिकची घोषणा केली होती. यासाठी त्यांची भाची माला तिवारी यांची परवाणगी घेण्यात आली आणि त्यांच्या आयुष्याची संपुर्ण कथा जाणून घेण्यात आली होती. हा चित्रपट त्यांच्या 94 व्या वाढदिवशी रिलीज होणार होता. चित्रपटाचे प्रोडक्शन स्पेक्ट्रम मूव्हीज बॅनर करतेय.
बप्पी लहरींचे म्यूझिक अटलची यांच्या कविता
चित्रपटाचे प्रोडक्शन राजीव धमीजा, अमित जोशी आणि रंजीत शर्मा करत आहेत. चित्रपटाची कथा ही अटलजींच्या बालपणापासून तर राजकारणात सक्रिय राहण्यावर आधारित आहे. हे बसंत कुमार यांनी लिहिले आहे. चित्रपटाला बप्पी लहेरी यांचे म्यूझिक असणार आहे. तर गीतांमध्ये अटलजी यांच्या कवीता घेण्यात आल्या आहेत.
हे तीन चित्रपट खुप आवडायचे
यामध्ये दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांचा 1955 मध्ये आलेला देवदास, 1963 मध्ये आलेला अशोक कुमार, नूतन आणि धर्मेंद्र यांचा बंदिनी, यासोबतच 1966 मध्ये आलेला राजकपूर आणि वहीदा रहमान यांचा तीसरी कसम या चित्रपटांचा समावेश आहे. ते हॉलिवूड चित्रपटही पाहायचे. यामध्ये त्यांना ब्रिज ओवर रिवर कवाई, बोर्न फ्री आणि गांधी हे चित्रपट खुप आवडायचे.
आवडते कलाकार
अटलजी यांना दिलीप कुमार, संजीव कुमार खुप आवडायचे. तर अभिनेत्रींमध्ये नूतन, राखी गुलजार आणि हेमा मालिनी यांचे ते चाहते होते. हेमा यांचा सीता और गीता त्यांनी 25 वेळा पाहिला होता.
लता-मुकेश आणि रफी यांचे गाणे
अटलजी यांना एस.डी बर्मन यांनी गायलेले मांझी हे गाणे खुप आवडायचे. परंतू त्यांना लता मंगेशकर, मुकेश आणि मोहम्मद रफी यांचे गाणे ऐकायला आवडचे. मुकेश आणि लता यांच्या आवाजातील 'कभी कभी मेरे दिल मे' हे त्यांचे आवडतीचे गाणे होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.