आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी दिल्लीच्या AIIMS हॉस्पिटमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर AIIMS हॉस्पिटमध्ये उपचार सुरु होते. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी वाजपेयींसोबतच्या भेटीचे किस्से शेअर केले आहेत. दरम्यान अभिनेता जॉनी लिव्हर यांचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जॉनी यांनी अनुपम खेर यांना दिलेल्या एका मुलाखतीत अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी निगडीत एक किस्सा शेअर केला होता. व्हिडिओत जॉनी सांगतात, एकदा वाजपेयींजींसोबत भेटीचा योग आला होता, तेव्हा खरं तर मी घाबरलो होतो. वाजपेयींची मिमिक्री केल्याने ते चिडतील तर नाही ना... असे सतत वाटत होते. पण घडले अगदी उलट. जॉनी लिव्हर यांना बघून अटल बिहारी आपल्या अंदाजात सगळ्यांना बाजुला करत म्हणाले - "अरे... माझा पार्टनर आला यार" आणि नंतर जॉनी यांना मिठी मारली. अटल बिहारी वाजपेयींनी दिलेला हा मान बघून जॉनी अतिशय आनंदी झाले होते. व्हिडिओत अनुपम यांच्या सांगण्यावरुन जॉनी लिव्हर यांनी वाजपेयींच्या अंदाजात एक जोक ऐकवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.