आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Atal Bihari Vajpayee Passes Away Biopic Will Going To Release On His 94th Birthday

अटल बिहारी यांच्या 94 व्या वाढदिवशी रिलीज होणार होता त्यांचा बायोपिक 'युगपुरुष अटल'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: अटल बिहारी वाजपेयी आता आपल्यामध्ये नाहीत. 16 ऑगस्ट 2018 रोजी दिर्घ उपचारांनंतर त्याचे निधन झाले. कवी, राजकारणी आणि भारतरत्न अटल बिहारी यांच्या 93 व्या वाढदिवशी डायरेक्टर मयंक पी श्रीवास्तव यांनी एका बायोपिकची घोषणा केली होती. यासाठी त्यांची भाची माला तिवारी यांची परवाणगी घेण्यात आली आणि त्यांच्या आयुष्याची संपुर्ण कथा जाणून घेण्यात आली होती. हा चित्रपट त्यांच्या 94 व्या वाढदिवशी रिलीज होणार होता. चित्रपटाचे प्रोडक्शन स्पेक्ट्रम मूव्हीज बॅनर करतेय. 


बप्पी लहरींचे म्यूझिक अटलची यांच्या कविता
चित्रपटाचे प्रोडक्शन राजीव धमीजा, अमित जोशी आणि रंजीत शर्मा करत आहेत. चित्रपटाची कथा ही अटलजींच्या बालपणापासून तर राजकारणात सक्रिय राहण्यावर आधारित आहे. हे बसंत कुमार यांनी लिहिले आहे. चित्रपटाला बप्पी लहेरी यांचे म्यूझिक असणार आहे. तर गीतांमध्ये अटलजी यांच्या कवीता घेण्यात आल्या आहेत. 

 

1924 मध्ये ग्वालियर येथे जन्म, मूळ रुपात कवी आणि शिक्षक 
वाजपेयी यांचा जन्म मध्य प्रदेशाच्या ग्वालियरमध्ये 25 डिसेंबर 1924 मध्ये झाला. ते मुळतः कवी होते आणि शिक्षकही राहिले आहेत. 1951 मध्ये जनसंघाची स्थापना झाली आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1957 मध्ये वाजपेयी मथुरेतून लोकसभा निवडणूक लढले परंतू त्यांचा पराभव झाला. परंतू ते बलरामपुर सीटवरुन विजयी झाले. 
- 1975-77 च्या काळात त्यांना अटक झाली. 1977 नंतर जनता पार्टीचे मोरारजी देसाई यांच्या सरकारामध्ये ते विदेश मंत्रीही राहिले. 1980 मध्ये त्यांनी लालकृष्ण अडवाणीसोबत मिळून भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. ते 10 वेळा लोकसभा सदस्य राहिले. 

बातम्या आणखी आहेत...