आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः अटल बिहारी वाजपेयी आता आपल्यात नाहीत. 16 ऑगस्ट 2018 रोजी दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. आज (17 ऑगस्ट) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होमार आहोत. कवी, राजकारणी आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींच्या 93 व्या वाढदिवशी दिग्दर्शक मयांक पी श्रीवास्तव यांनी त्यांच्यावर एक बायोपिक बनवणार असल्याची घोषणा केली होती. वाजपेयी यांच्या भाची माला तिवारी यांच्या परवानगीनंतर श्रीवास्तव यांनी वाजपेयींचे संपूर्ण आयुष्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वाजपेयींच्या 94 व्या वाढदिवशी ही बायोपिक रिलीज होणार होती. हा चित्रपट प्रॉडक्शन स्पेक्ट्रम मुव्हीजच्या बॅनरमध्ये तयार झाला आहे.
वाजपेयींच्या कवितांना बप्पी लहरींचे संगीत...
या चित्रपटाचे निर्माते राजीव धमीजा, अमित जोशी आणि रंजीत शर्मा आहेत. चित्रपटाची कथा वाजपेयींच्या बालपणीपासून ते राजकारणातील प्रवासावर आधारित आहे. बसंत कुमार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर संगीतकार बप्पी लहरी आहेत. वाजपेयींच्या कवितांना त्यांनी संगीतबद्ध केले आहे.
1924 मध्ये ग्वाल्हेरमध्ये जन्मलेले वाजपेयी एक कवी आणि पत्रकार...
- वाजपेयी यांचा जन्म मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे 25 डिसेंबर 1924 रोजी झाला होता. ते कवी आणि पत्रकारही होते. 1951 साली त्यांनी जनसंघची स्थापना केली आणि राजकारणात प्रवेश केला होता. 1957 साली त्यांनी मथुरेतून लोकसभा निवडणूक लढवली होती.
- 1975-77 च्या आणीबाणीच्या काळआत त्यांना अटक झाली होती. 1977 नंतर जनता पक्षाच्या मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये ते विदेश मंत्री होती. 1980 साली त्यांनी लालकृष्ण आडवाणींसोबत मिळून भारतीय जनता पार्टीचा पाया रचला. ते दहा वेळा लोकसभा सदस्य राहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.